Thursday, February 26, 2026
Homeमुंबईमूकनायक च्या वर्धापन दिनी बहुजन मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब...

मूकनायक च्या वर्धापन दिनी बहुजन मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ इंडिया ची डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापना

मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 31मार्च 1920 रोजी मुंबई मध्ये मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात केली त्याला 106 वा वर्धापन दिनी दिनांक 31जानेवारी 2026 रोजी डॉ आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड,दादर पूर्व, मुंबई येथे सकाळच्या सत्रात डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते बहुजन मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना आणि संध्याकाळ च्या सत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. बहुजन मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख पॅट्रोन म्हणून डॉ भीमराव य आंबेडकर यांची निवड करण्यात आली व बहुजन मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्षपदी शिरीष वानखेडे यांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ भीमराव य आंबेडकर यांनी बहुजन मीडिया च्या पुढील वाटचालीबाबत प्रमुख मार्गदर्शन केले.तसेच सुभचन राम (रिटायर्ड इन्कम टॅक्स चीफ कमिशनर), शिरीष वानखेडे, विजय मैसूरिया (गुजरात) यांनी आपले विचार मांडले. यावेळी लॉर्ड बुद्धा, मूकनायक, आवाज इंडिया , न्यूज हब इत्यादी प्रमुख मिडिया चे किशोर दानी (मुंबई), तुषार गायकवाड (पुणे), विनोद कांबळे, सुरेश ढेरे, राजस्थान मधून पुरणमल बौद्ध, गणेशलाल यादव , मगनलाल यादव, भारतीय बौद्ध महासभा मिडिया/ धम्मयान मासिकचे सी बी तेलतुंबडे, सिद्धार्थ अहिरे, रविंद्र इंगळे तसेच समता सैनिक दलाचे अशोक कदम,डी एम आचार्य, चंदाताई कासले इत्यादी प्रमुख प्रतिनिधी सहभागी झाले होते.
संध्याकाळच्या सत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रमाबाईनगर हत्याकांड या केस लढलेल्या प्रसिद्ध वकील केसरी प्रकाश मौर्य यांची निवड करण्यात आली. या वेळी ॲड संजय कोल्हापुरे (अध्यक्ष,दादर बार असोसिएशन ) ॲड रावसाहेब मोहन , ॲड अशोक कोटांगले, ॲड किशोर वाळुंज, ॲड नितीकेश कोटांगले, ॲड केसरी मौर्य यांनी आपले विचार मांडले. या बैठकीस ॲड कुणाल फुले (सेक्रेटरी, अंधेरी बार असोसिएशन) , ॲड नवीन चव्हाण(गुजरात) इत्यादी प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती पुढे नेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा/ समता सैनिक दल मातृसंस्था म्हणून या दोन्ही असोसिएशन सोबत राहण्याचा संकल्प भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष, (केंद्रीय कार्यालय प्रमुख) व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी जाहीर केला.यांनी दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक व असोसिएशन स्थापन करण्यामागची भूमिका भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय विभाग सचिव कॅप्टन प्रविण निखाडे यांनी केले व सूत्र संचालन ॲड एस के भंडारे यांनी केले. आभारप्रदर्शनॲड प्रकाश मौर्य यांनी केले. येणाऱ्या 24 मार्च रोजीच्या महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन च्या निवडणुकीत आंबेडकरी विचारधाराचा वकील निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येण्याचे ठरले।

- Advertisment -

Most Popular

Recent Comments