मूकनायक जिल्हा प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड ( अहमदनगर )
दि 16 मे 2022 सम्राट अशोक बुध्द विहार, गजानन कॉलनी, नवनागापूर अहमदनगर याठिकाणी आज दिनांक 16 मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली.यावेळी बुद्ध अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन करण्यात आले. व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बुध्द विहार कमिटीचे अशोक साळवे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. व बुद्ध जयंती निमित्त वाघमारे परिवाराच्या खीर वाटत करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित अशोक साळवे, नितीन वाघमारे, मानव भालेराव, अशोक मस्के, मूकनायक चे पत्रकार सुनिल एच. गायकवाड, योगेश वाघमारे, आनंद गायकवाड, संदीप अडागळे,आनंद जाधव, भारत मानतोडे,लक्ष्मण कांबळे, कमल कांबळे, साळवे ताई, जिजाबाई वाघमारे, सुशीला आठवले, ई .जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

