मुकनायक जिल्हा यवतमाळ प्रतिनिधी:चांदू मोरे
त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली महागांव शहरातील बौद्ध विहारा पासुन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक रॅलीचे आयोजन केले या वेळी समता सैनिक दल व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमरखेड महागांव चे मा. आमदार नामदेव ससाने साहेब व यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक दिलिप भुजबळ साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नामदेव ससाने साहेब जिल्हा अधिक्षक पोलीस दिलिप भुजबळ साहेब नगर अध्यक्षा. करूनाताई शिरबिरे प्रा. शरदचंद्र डोंगरे संभाजी दादा नरवाडे रामराव नरवाडे महेन्द्र कावळे माणिक मुनेश्वर पत्रकार महासंघाचे रवी भाऊ कावळे गजानन वाघमारे व्यापारी महासंघाचे जगदीश भाऊ नरवाडे प्रमोद भरवाडे दिपक आडे सुरेश नरवाडे राजाभाऊ राठोड यांच्या सह शहरातील नेते व पद आधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

