Thursday, February 26, 2026
Homeदेशरावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन साजरा.

रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन साजरा.

हवेली प्रतिनिधी :रोहन सोनाळे
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी
नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रशिक्षित रोबोटद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यामध्ये धवला पाटील, अमेय अजगर, अभय सिंग, आदित्य ठोंबरे व अथर्व भिसे यांनी विज्ञान शिक्षिका डॉ. नीरु मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण केले. संगीत शिक्षक सुलोचना पवार आणि प्रथमेश इनामदार यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. शिक्षिका प्रणिता शर्मा व रचना सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनाचे महत्व सांगितले. माजी विद्यार्थी प्रबल मल्होत्रा, उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा, पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका शुभांगी कुलकर्णी, क्रीडाशिक्षक धनाजी पाटील, स्वलेहा मुजावर आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे. उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव श्री.विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी प्रजासत्ताक दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
—————————–

- Advertisment -

Most Popular

Recent Comments