Thursday, February 26, 2026
Homeदेशसावित्रीमाईना अभिवादन.

सावित्रीमाईना अभिवादन.

मूकनायक तालुका प्रतिनिधी :- प्रशांत नरवाडे

औंढा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, काठोडा तांडा येथे विविध उपक्रमातू क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक के.एस. जटाळे सर यांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थिनींनी समूहगीत गायनातून सावित्रीमाईना अभिवादन केले कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षणाचे महत्व पटवून देणारी लघुनाटिका विद्यार्थिनींनी सादर केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक श्री.प्रभाकर महामुने, मिलिंद कोरडे, देविदास देवळे, श्रीमती रूपाली हिंगमिरे,स्वाती चापके,श्री.सुनील मुळे व संदीप रणवीर यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments