Thursday, February 26, 2026
Homeदेश"आसक्या" कथासंग्रहाचा कोरेगाव भीमा विजयस्तंभाजवळ प्रकाशन सोहळा

“आसक्या” कथासंग्रहाचा कोरेगाव भीमा विजयस्तंभाजवळ प्रकाशन सोहळा

हवेली प्रतिनिधी :रोहन सोनाळे।

पिंपरी (दि. ४ जानेवारी २०२२) नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे अर्थात कवी वादळकार यांच्या “आसक्या” या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन कोरेगाव भीमा शुरवीरांच्या विजयस्तंभाला मानवंदना देऊन दलित पॅंथरचे अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांच्या हस्ते शनिवारी १ जानेवारीला प्रकाशन करण्यात आले.
१ जानेवारी शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आंबेडकर अनुयायी लाखोंच्या संख्येने दरवर्षी येथे येत असतात. शनिवारी कोरेगाव भीमा शूरवीर विजयस्तंभाजवळ झालेल्या सोहळ्यास सुखदेव सोनवणे, प्रा. राजेंद्र सोनवणे, शुभम सोनवणे, निलेश आल्हाट, विकास भोसले, बाबू वैराट, यवन पोतदार, उषा राजगुरु, साईराजे सोनवणे, सागर सावंत, रशीद शेख आदी उपस्थित होते.
यावेळी सुखदेव सोनवणे प्रकाशन करताना म्हणाले,” सामान्य माणसाला खेडोपाडी जीवन जगत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी अजुनही पराकोटीचा संघर्ष करावा लागतो याचे आसक्याच्या ग्रामीण कथांमध्ये पडसाद उमटले आहे. या लघुकथा ग्रामीण भागातील वंचित, शोषित, उपेक्षित घटकांची वास्तव परिस्थिती कथांमध्ये आहे. ग्रामिण भागातील विविध व्यक्तिमत्व कथांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केला आहे. वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी सहज समजणारी ग्रामीण बोली भाषा त्यांनी वापरली आहे. ग्रामिण भागातील वास्तवाकडे घेऊन जाणा-या “आसक्या” मधील कथा सर्वसामान्यांना विचार करायला लावणा-या आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments