Thursday, February 26, 2026
Homeदेशसमाजकल्याण आयुक्त डॉ .प्रशांत नारनवरे यांचा विजयस्तंभ पाहणी दौरा संपन्न.

समाजकल्याण आयुक्त डॉ .प्रशांत नारनवरे यांचा विजयस्तंभ पाहणी दौरा संपन्न.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पुणे)

दि.22 डिसेंबर : भीमा कोरेगाव येथे 01 जानेवारी रोजी होणाऱ्या विजस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या
नियोजनाबाबत समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी विजयस्तंभ परिसरात पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ
आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समधीस्थळास भेट दिली.
विजयस्तंभ परिसरात मूलभूत सोयी, सुविधा, सुशोभीकरण व विकासासह तसेच शौर्य दिन व अल्पकालीन व दीर्घकालींन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्यायविभागा मार्फत करण्यात येणार असल्याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच घोषणा केली. त्याअनुषंगाने समाज कल्याण आयुक्त यांच्या कडून विजयस्तंभ परिसराचा पाहणी दौरा व आढावा घेण्यात आला.
यावेळी बार्टी चे महासंचालक धम्मजोती गजभीए,प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, रिपब्लिकन विध्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, अरविंद पांडे आदींसह विजयस्तंभ स्मारक समितीचे पदाधिकरी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments