Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्याप्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या...

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी.

वरिष्ठ प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पिंपरी चिंचवड दि. ०८ एप्रिल २०२५ बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती व बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने सलग ४थ्या वर्षी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता तथागत भगवान बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूज्य भंन्ते धम्मानंद यांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात गेली.
बुद्ध वंदना सूक्तपटन घेण्यात आले या वेळी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी ४:०० वाजता लहान बालकांनी वेगवेगळ्या प्रकारचे बुद्ध स्तूप बनवली होती ती कार्यक्रम स्थळी प्रदर्शित केली व सम्राट अशोक यांची अतिशय सुंदर अशी चित्र काढली होती.
सायंकाळी ६:०० वाजता प्रियदर्शिक चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकापासून ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडी या ठिकाणाहून काढण्यात आली व या मिरवणुकीची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी या ठिकाणी करण्यात आली या मिरवणुकीमध्ये डान्स ग्रुप लेझीम पथक व शहरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संध्याकाळी ७:३० वाजता व्याख्यानाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेणी प्रेमी इतिहास प्रेमी रवी कांबळे हे होते. व स्वागत अध्यक्ष बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस हे होते.
व प्रमुख व्याख्याते डॉ. महेश देवकर (विभाग प्रमुख पाली भाषा व बुद्धिस्ट स्टडी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सम्राट अशोक यांच्या शिलालेख व कार्याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच दुसरे व्याख्याते सागर कांबळे संचालक बोधिसत्व चॅनल प्राचीन बौद्ध वारसा शोध कर्ते यांनी सम्राट अशोक यांच्या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
वरील दोन्ही व्याख्यात्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कार्य करत असणारे विशाल गायकवाड व महाराष्ट्र राज्यामध्ये लेणी संवर्धन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कार्य करणारे सारीस डोळस यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
लहान चिमुकल्या बालकांनी बुद्ध स्तूप बनवली होती व सम्राट अशोक यांचे चित्र काढली होती त्यांचाही सन्मान करण्यात आला.
जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री १:३० वाजेपर्यंत ८ फुटांचे त्रिरत्न चिन्हाची सुंदर अशी रांगोळी काढल्याबद्दल राजू साळवे यांनाही सन्मानित करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने भव्य मिरवणुकीस व कार्यक्रमास सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
रात्री १०:०० वाजता कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सवास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तसेच पुणे मुंबई अमरावती व गुजरात येथील बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला व तन-मन धनाने जयंती महोत्सव यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या बंधू-भगिनींचे खूप खूप स्वागत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments