Friday, November 20, 2026
HomeUncategorizedरोहित पठारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर आक्रमक; सरकारसमोर तीन...

रोहित पठारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर आक्रमक; सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या!मुख्यमंत्र्यांचा निषेध;

मूकनायक विशेष…

२२ नोव्हेंबरच्या समृद्धी महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचा जाहीर पाठिंबावैजापूर : रोहित पठारे यांच्या अमानुष हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आता आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेतेही मैदानात उतरले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या.या भेटीदरम्यान डॉ. भीमराव आंबेडकर यांनी वैजापूर पोलीस स्टेशनला भेट देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या प्रकरणातील २५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी त्यांना दिली.मात्र, केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, तर पीडित कुटुंबाला जलदगतीने आणि निष्पक्ष न्याय मिळणे आवश्यक आहे,

अशी भूमिका मांडत डॉ. भीमराव आंबेडकर यांनी पुढील तीन प्रमुख मागण्या केल्या.१. फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी : रोहित पठारे हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळावी.२. एसआयटीमधील अधिकाऱ्यांची बदली : सध्या स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकातील (SIT) भागवत खुंडे आणि प्रदीप भिवसेने या दोन पोलीस अधिकाऱ्यांना बदलून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.३. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती : पीडित कुटुंबाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची (Special Public Prosecutor) नियुक्ती करण्यात यावी.रोहित पठारे यांची अमानुष हत्या आणि या प्रकरणातील अन्यायकारक परिस्थितीचा निषेध व्यक्त करत डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांचाही निषेध केला. तसेच येत्या २२ नोव्हेंबर रोजी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. दोन्ही संघटना या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होणार असून, हे आंदोलन शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय रोहित पठारे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन आणि वकिलांची मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही डॉ. भीमराव आंबेडकर यांनी भेटीनंतर पत्रकारांशी आणि उपस्थित सकल आंबेडकरी समाज बांधवांशी बोलताना दिली.रोहित पठारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आंबेडकरी समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार असून, न्यायासाठीचा लढा थांबणार नाही, असा निर्धार यावेळी उपस्थित सकल आंबेडकरी समाज बांधवांनी व्यक्त केला.या प्रसंगी संस्थेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. डॉ. एस. के. भंडारे, ट्रस्टी डॉ. राजाराम बडगे, राज्याध्यक्ष यू. जी. बोराडे, राज्य संघटक गौरव पवार, राज्य संघटक तथा दलाचे मेजर जनरल किशोर जोहरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर, सरचिटणीस नरेश पवार, उपाध्यक्ष गौतम पगारे, दलाचे अतिष त्रिभुवन, छत्रपती संभाजीनगर महानगर जिल्हाध्यक्ष रमेश बनसोडे, छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्हाध्यक्ष सुनील वंजारी, समता सैनिक दलाचे अनिल राऊत आणि जयवंत गायकवाड, पत्रकार आबासाहेब कसबे, कवी-गायक विजय मोकळे, सरपंच पडवळ यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, वैजापूर येथील ग्रामस्थ, बौद्ध बांधव, संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोहित पठारे यांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच भूमिका घेऊन भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि संपूर्ण आंबेडकरी समाज या न्यायलढ्यात ठामपणे उभा राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments