Monday, September 28, 2026
Homeमहाराष्ट्रस्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

सोलापूर प्रतिनिधी : शांताराम वाघमारे

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर आणि महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त सैनिक अधिकारी व कर्मचारी यांची यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवपुत्र घटकाबळे यांच्या नेतृत्वाखाली बिगुलाच्या निनादात भारतीय तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. उपस्थितांनी सामूहिकरीत्या राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मस्के यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून, मिळालेले स्वातंत्र्य देशहितासाठी जपणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

या प्रसंगी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे डॉ. अंगद मुके, नाना गाडे, गौतम चंदनशिवे, शांताराम वाघमारे, किसन सुरवसे, सुधाकर सुरवसे, गोपी कांबळे, नागेश गायकवाड, श्रीमंत गायकवाड, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, अशोक सोनवणे, कैलास गायकवाड तसेच यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशनचे कमलाकर माने, शिवपुत्र घटकाबळे, मारुती मोरे, शंभू देव सुरवसे, लिंबाजी कांबळे, विष्णू वाघमारे, मल्लिकार्जुन धसाडे, मसण्णा मणुरे, सुरेश गेजगे, चंद्रकांत बनसोडे, राहुल साबळे, गुंडू केंगार, अशोक कांबळे, श्रीकांत गजघाटे, सिद्धार्थ गायकवाडे, सुरेश खलसोडे, गणपत आयगोळे, सत्यवान वाघमारे, नागनाथ शिंदे, विवेकानंद सावंत, भाऊसाहेब वंजारी, भारत कांबळे आदी उपस्थित होते.

याशिवाय भारतप्रेमी, आंबेडकरप्रेमी सुजाण नागरिक, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाक्य संस्थेचे डॉ. अंगद मुके यांनी उपस्थितांचे आभार मानून सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments