Saturday, July 11, 2026
Homeमहाराष्ट्रजि.प.प्रा. शाळा वायवाडी शाळेच्या स्वयंदीप शंकर गच्चे हा पाचवी स्कॉलरशिप मध्ये हिमायतनगर...

जि.प.प्रा. शाळा वायवाडी शाळेच्या स्वयंदीप शंकर गच्चे हा पाचवी स्कॉलरशिप मध्ये हिमायतनगर तालुक्यातून दुसरा

पोटा/वडगाव: जि.प.प्रा.शाळा वायवाडी शाळेचा स्वयंदिप शंकर गच्चे पाचवी स्कॉलरशिप मध्ये हिमायतनगर तालुक्यातून दुसरा आला आहे. त्याचबरोबरअत्यंत स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या देशपातळीवरील सैनिकी स्कूल प्रवेश प्रक्रियेत त्याने उल्लेखनीय कामगिरी करत ३०० पैकी २६० गुणासह त्याची पहिल्याच फेरीमध्ये महाराष्ट्रातील अव्वल समजल्या जाणाऱ्या सैनिकी स्कूल चंद्रपूर साठी एस.सी.कॅटेगिरीतून तीन नंबरला निवड निवड झाली आहे. देशपातळीवर असे ३३ सैनिकी स्कूल आहेत.सैनिकी स्कूल प्रवेश प्रक्रियेच्या एकूण सहा फेऱ्या होतात. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच त्याने नवोदय प्रवेश परीक्षेत देखील उल्लेखनीय कामगिरी करत ९१.२५ गुण प्राप्त केले आहेत. राज्य पातळीवर होणाऱ्या मंथन परीक्षेत नांदेड येथील चाणक्य कोचिंग क्लासेस श्रीनगर, येथील सेंटर मधून १ ला जिल्ह्यामधून २३ वा तर राज्याच्या गुणवत्ता यादीत ३०वा आला आहे. त्याबद्दल त्याला सुवर्णपदक देऊन त्याचा सत्कार झाला आहे. त्याचबरोबर कोणाळे कोचिंग क्लासेस येथून भारत टॅलेंट सर्च या राज्यपातळीवरील परीक्षेत देखील सेंटर मधून प्रथम जिल्ह्यातून ९वा तर राज्यातून १४ वा आला आहे. त्याला गेल्या वर्षी देखील सुवर्णपदक मिळाले होते. स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी बालवयापासून तयारी करणे आवश्यक असल्याचे मत स्वयंदीपने व्यक्त केले आहे. स्वयंदीपच्या यशात हिमायतनगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.चेटले साहेब. सरसम बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पंडितराव तळेगावकर,कन्या बीट हिमायतनगरचे शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, पोटा केंद्राचे केंद्रप्रमुख पद्माकर कुलकर्णी, सरसम केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश कोकुलवार पोटा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक तसेच तालुक्याचे योजना प्रमुख प्रमुख संजय जाणते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव हरी आडे, ग्रामविकास अधिकारी आनंद कदम, सरपंच कांताबाई बरडे, उपसरपंच मधूकरराव राठोड, तसेच गावचे कारभारी, नायक, पोलीस पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशात आई-वडिलांचे मोलाचे योगदान आहे. स्वयंदीपला मार्गदर्शन करणारे सहशिक्षक दत्ता मुसांडे, चंद्रकांत जाणते, प्रियंका आंबुरे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक, गावकरी यांच्यावतीने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments