Thursday, July 16, 2026
Homeमहाराष्ट्रगोवा राज्य शाखेचे पुनर्गठन व एकदिवसीय कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण उत्साहात संपन्न

गोवा राज्य शाखेचे पुनर्गठन व एकदिवसीय कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण उत्साहात संपन्न

मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे….9920806563

गोवा, दि. 12 जुलै 2026 : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने गोवा येथे रविवार, दि. 12 जुलै 2026 रोजी एकदिवसीय कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण व चिंतन शिबिर तसेच गोवा राज्य शाखेच्या पुनर्गठनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई कार्यालय प्रमुख ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी भारतीय बौद्ध महासभेचा इतिहास, ध्येय, उद्दिष्टे, मिशन, संघटनात्मक बांधणी तसेच कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर विवेचन केले. संघटना सक्षम करण्यासाठी शिस्त, पारदर्शकता, नियमित हिशोब-निकाल आणि प्रभावी संघटनात्मक कार्यपद्धतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा राज्य प्रभारी डॉ. राजेश पवार यांनी शाखांचे प्रभावी संचालन, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता, सदस्यता अभियान आणि संघटन विस्तार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त गोव्यातील स्थानिक परंपरेनुसार एस. के. जाधव यांच्या पुढाकाराने उपस्थित कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करून आशीर्वाद गाथेद्वारे त्यांना शुभेच्छा अर्पण केल्या.

बैठकीच्या समारोपावेळी धम्म प्रचार, सदस्यता अभियान, शाखा विस्तार, पदाधिकाऱ्यांची कर्तव्ये तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी गोवा राज्य शाखेच्या पुनर्गठनाची घोषणा करून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली.

नवीन कार्यकारिणीमध्ये एस. के. जाधव यांची राज्याध्यक्ष, निखिल प्राजक्ते यांची महामंत्री, सतीश पवार यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच इतर पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्य गोव्यातील सर्व जिल्हे, तालुके आणि शहरांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत धम्म आणि संघटनेचे कार्य प्रभावीपणे पोहोचवून राज्यभर मजबूत संघटन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments