मुकनायक राजरत्न जाधव,ठाणे जिल्हा ब्युरो चीफ
ठाणे : क.डों.म.पा कडून कल्याण महानगर पालिकेच्या हद्दीतील बुद्धभूमी फाउंडेशन जागेवर कोणतीही शहानिशा न करता तसेच बुध्दभूमी फाउंडेशन जागेतील देखभाल सुरक्षा करणाऱ्या फाउंडेशन विश्वस्तान्ना विश्वासात न घेता बेकायदेशीर कार्यवाही करत बौद्धधार्मियांच्या धार्मिक बौद्ध वास्तुवर कल्याण महानगर पालिकेतर्फे तोडक कार्यवाही करण्यात आली.
ह्यावर प्रतिकार म्हणुन सर्व उपासक तसेच भन्ते गौतम रत्न थेरो ह्यांनी समजबांधवाना बुद्धभूमी बचाव करण्यासाठी आव्हान केलं आहे तसेच 5 जून रोजी असंख्य समजबांधव सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्या उपस्थितीत 15 जून रोजी क. डो. म. पा लीकेच्या अंदाधुंद कार्यवाही विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ह्यात विरोध करणाऱ्या बौद्ध भन्तेवर खोटे FIR दाखल करण्यात आले ते FIR मागे घेण्यात यावे व बुद्ध भूमी संबंधातील बेकायदेशीर कार्यवाही थांबवावी हे ह्या आंदोलनाचा उद्देश आहे.हे आंदोलन 9 दिवस चालणार असून त्यापलीकडे जर पालिका प्रशासनाने ह्या आंदोलनास कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 25 जून रोजी सर्व कार्यकर्ते व समाजबांधवांकडून महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कल्याण बुद्ध भूमी फाउंडेशन च्या 5 तारखेच्या बैठकीत प्रशासनाला लेखी स्वरूपात देण्यात आला.

