Friday, July 17, 2026
Homeमहाराष्ट्रबार्टी कडून महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

बार्टी कडून महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

वसमत :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बार्टी )पुणे. प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे यांनी केले.

महाराणा प्रताप जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक श्रीराम वडे सर होते. प्रमुख पाहुणे आळणे मिलिंद यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा व स्वाभिमानी जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आदर्शांवर प्रकाश टाकत तरुण पिढीने त्यांचा प्रेरणादायी वारसा जपावा, असे आवाहन केले.

या प्रसंगी श्रीराम वड्डे, संकेत कदम, रितेश मुळे, पियुष सदावर्ते,कपिल भालेराव,शंकर आगलावे, धम्मदीप सदावर्ते,कोंडीबा नरवाडे, संकेत नरवाडे, शिवम नरवाडे, आळणे मिलिंद, कपिल खेबाळे यांच्यासह , विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments