Thursday, June 11, 2026
Homeदौंडपुणे जिल्ह्यातील नसरापुर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास फाशी...

पुणे जिल्ह्यातील नसरापुर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास फाशी द्या, मानोविकास चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.श्रीरामवार यांनी राष्ट्रपतींकडे केली मागणी.

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड – पुणे जिल्हात असणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापुर या गांवात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या गावात एका 65 वर्षीय इसमाने 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना दि.1 मे महाराष्ट्र दिनी उघडकीस आली.

बलात्काराच्या या अमानुष घटनेमुळे पुणे जिल्ह्यसह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिची निर्घणपणे केलेली हत्या या प्रकरणातील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत आरोपीचा खटला ताबडतोब फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषी आरोपीना जाहीर फाशी देण्याचौ मागणी प्रा.दादासाहेब ऊर्फ रूपेशकुमार श्रीरामवार राष्ट्रीय अध्यक्ष मानोविकास सामाजिक सेवा प्रतिष्ठाण च्या वतीने महामहिम राष्ट्रपती श्री. द्रौपदी मुर्मूजी यांना. पाठविलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे.

प्रा.श्रीरामवार यांनी आपल्या निवेदनात या संदर्भात अनेक मागण्या नमूद केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रात – वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या प्रकरणासाठी सशक्त न्यायव्यवस्था व कठोर कायदे बनवून दोर्षीना एक महिन्याच्या आत फाशी देण्याची मागणी केली आहे. भोर तालुक्यातील नसरापुर येथील 3वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास लवकरात लवकर जाहीर फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी मानोविकास च्या माध्यमातून करण्यात आली. अल्पवयीन मुली व महिलांच्या बलात्कार प्रकरणांची न्यायालयात नित्य सुनावणी, जनतेसाठी पोलिसांचे दायित्व व पारदर्शकता तपासण्यासाठी सशक्त फास्टट्रॅक ची निर्मिती, बलात्कार संदर्भात पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुधार, फॉरेन्सिक लायब्ररी व फॉरेन्सिक विभागाच्या कार्यशैली, सशक्त सुधार बलात्कार पिढितासाठी मदत, महिला व बालकांच्या हत्या होत असलेल्या निर्भया फंडाची निर्मिती, फास्टट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून बलात्काराची सर्व प्रकरणे ताबडतोब निकाली काढण्यात यावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

निवेदनाच्या प्रति महामहिम राष्ट्रपती मा.श्री.द्रौपदी मुर्मुजी, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी , महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्माजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस , मा.जिहाधिकारी नांदेड, मा.पौलिस अधीक्षक नांदेड यांना पाठवण्यात आले आहे तसेच मा.तहसिलदार उमरी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. या वेळी उपस्थित मानोविकास सामाजिक सेवा प्रतिष्ठाण चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.दादासाहेब ऊर्फ रूपेशकुमार श्रीरामवार , भीम आर्मी नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्निल भोसीकर, जिल्हा कोषाध्यक्ष नदीम बेग, मानोविकास सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे धर्माबाद तालुकाध्यक्ष योगेश गुरुलवाड, रामचंद्र देस्टेवाड, प्रकाश वच्चेवार, अमोल बक्केवाड आदी अनेक जण या वेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments