मूकनायक दौंड ता. प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड : बुद्धिस्ट नालंदा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित, नालंदा बुद्ध विहार , भोईटेनगर(नालंदा नगर) येथे दिनांक ३ मार्च २०२६ तथागत बुद्धांच्या जीवनात सर्व पौर्णिमा महत्वाच्या आहेत,पण फाल्गुन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुध्द सम्यक संबुद्ध झाले. व प्रथमच कपिलवस्तू नगरीत व त्यांच्या राजवाड्यात वडील शुद्धोधन यांचे आग्रहास्तव आले.भोजनानंतर माता प्रजापती गौतमीने भिक्खू संघाला स्वतः विणलेले चीवर दान केले, राजा शुद्धोधन यांनी बुध्द प्रवचने ग्रहण केले. यशोधरा यांनी मुलगा राहुल साठी आपल्या पित्याकडे वारस हक्क मागितला त्यामुळे राहुलची धम्म दीक्षा झाली. नंद याची पण धम्म दीक्षा झाली असे विचार सचिव बी. वाय. जगताप यांनी व्यक्त करताना सद्यस्थितीच्या युद्धाचा विचार करत जगाला युद्धाची नसून बुद्धाची गरज आहे असे प्रतिपादन केले. फाल्गुन पौर्णिमा व कार्यक्रम बुद्धिस्ट नालंदा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ. भिमराव मोरे अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला,त्यांनी नालंदा बुध्द विहार कामाचा संपूर्ण आढावा घेतला. याप्रसंगी जयदीप बापूराव कांबळे यांचे परिवाराने धम्म वंदना घेतली, त्यांनी आपले वडील कालकथित बापूराव ईश्वर कांबळे यांचे स्मृतीनिमित्त आहुजा स्पीकर सेट सस्नेपूर्वक धम्मदानाचे स्वरूपात भेट दिला. या कार्यक्रमास आयु.विजयकुमार गायकवाड,सूर्यकांत जानराव,सैदप्पा गायकवाड, के.के.खंडीझोड,अरुण ओहोळ,लक्ष्मी बापूराव कांबळे व त्यांचा सर्व परिवार उपस्थित होता.

