Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडइंद्रायणीनगर भोसरी येथील ग्रंथालयं, संगीत विद्यालय आणि प्रथमोपचार केंद्रासाठी आरक्षित जागेत अतिक्रमण...

इंद्रायणीनगर भोसरी येथील ग्रंथालयं, संगीत विद्यालय आणि प्रथमोपचार केंद्रासाठी आरक्षित जागेत अतिक्रमण करून उभारले रातोरात मंदिर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ डिसेंबर २०२४ डॉ. किर्तीराज काटे, दंत शल्यचिकित्सक व सहकार्‍यांनी वेळोवेळी या अतिक्रमा संदर्भात निवेदने दिलेली आहेत. डॉ. किर्तीराज काटे यांच्या घरा समोरील मोकळी जागा ही ग्रंथालय, संगीत विद्यालय आणि प्रथमोपचार केंद्र यासाठी आरक्षित आहे. मात्र, त्या जागेवर एका खासगी ट्रस्टने अनधिकृतरित्या मंदिर बांधले आहे.
या संदर्भात येथिल जागृतनागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त व अन्य प्रशासनाला अर्ज सादर करून तक्रार केली आहे. पण अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यावरून असे वाटते आहे की प्रशासन जाणूनबूजून या विषयाला बगल देते आहे.

मंदिर उभारणीविरोधात सोसायटी मधील नागरिकांनी सुरुवातीपासून विरोध दर्शवला होता. परंतु, मध्यरात्री अनधिकृतरीत्या बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या संदर्भात ‘क’ प्रभागात तक्रार देण्यात आली होती पण फक्त नोटीस लावून अधिकारी गायब झाले ते आजतागायत पून्हा फिरकले देखिल नाहीत कोणाच्या वरदहस्तामूळे ही दिरंगाई होते की चिरीमिरी घेवून अधिकारी टाळाटाळ करताहेत हे समजणे अवघड आहे.
या मंदिरामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. रात्री उशिरा जोरजोराने वाद्य वाजवून आरती केली जाते.
या संदर्भात मागील महिन्यात रात्री ९.३० वाजता आरतीमुळे त्रास झाल्याने पोलिसांत तक्रार करावी लागली. यानंतर पून्हा पालिकाप्रशासनास संपर्क साधला पण “पालथ्याघड्यावर पाणी” नेहमी प्रमाणे टाळाटाळ करण्यात आली.
शेजारी मंडई असल्याने भाजी विक्रेते, स्थानिक रहिवासी व परिसरातील इतर नागरिकही यामुळे त्रस्त आहेत. पण प्रशासनाला याचा फरकच पडत नाही.
जर ही जागा ग्रंथालय, संगीत विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित आहे. आणि ती याच कामाकरिता वापरण्यात आली, तर इंद्रायणी नगरच्या सामान्य नागरिकांना मोठा लाभ होईल असे डॉ. किर्तीराज काटे व स्थानिक नागरिक बोलले.
यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली की या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी व या जागेचा नियोजित सामाजिक उपयोग सुनिश्चित करावा. अनधिकृत बांधकाम काढून जागा मूळ उद्दिष्टासाठी वापरण्यात यावी. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
यावेळी बाळासाहेब इचके, हृषिकेश गुरव, प्रथमेश ढोले, सार्थक ढोले, अरुण गायकवाड, मधुकर कारंडे, नरहरी शिंपी, सारिका पोफले, निखिल जोशी , श्रीनिवास पवार, प्रशांत माळी, योगेश पाटील, अर्चना पाटील, लोहार काकू, अनिकेत जैन, उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments