Thursday, February 26, 2026
Homeधारशिवडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गरळ ओखनाऱ्य अमित शहा व परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गरळ ओखनाऱ्य अमित शहा व परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ भिसैनिकांचे नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा आंदोलन.

धारशिव (मारुती बनसोडे जिल्हा चीफ ब्यूरो धाराशिव):
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान बद्दल अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि परभणी येथील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिस प्रशासनाच्या विरूद्ध नळदुर्ग ता.तुळजापूर येथे नळदुर्ग आणि परिसरातील भिमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढून जाहीर निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर ,आंबेडकर असे म्हणण्याची फॅशन झाली आहे.असे म्हणून त्यांचा अवमान केला.अमित शहा यांच्या या आक्षेपार्ह विधानचा‌ जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात नळदुर्ग येथे भिमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढण्यात आला होता.भिमनगर नळदुर्ग येथील बौद्ध विहार पासून मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मोर्चास सुरूवात करण्यात आली.भिमनगर बौद्ध विहार ते कुरेशी गल्ली, किल्ला गेट, चावडी चौक मार्गे भव्य निदर्शने करित अमित शहा यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा येथील बसस्थानका समोर संविधान चौकात येऊन थांबला.या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर निषेध सभेत रूपांतर झाले.या प्रसंगी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,शाहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पन्नास लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरूपी निलंबित करुन त्यांच्याशर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदी सह विविध मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले.यावेळी सुनील बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे,एस.के.गायकवाड, किशोर नळदुर्गकर, कैलास गवळी गुरुजी, अरूण लोखंडे, योगेश बनसोडे, सचिन बनसोडे, सिध्दांत बनसोडे, अजयकुमार बागडे,रूषीकेश कांबळे,अश्वजीत‌ कांबळे ,मारुती बनसोडे,शामकांत नागीले, दत्ता बनसोडे, महादेव कांबळे, राजेंद्र शिंदे,सरेश लोंढे, विश्वास रणे, तानाजी कदम, रवी वाघमारे, अनिल वाघमारे,महिला कार्यकर्त्यां उषा शिंदे, पिंकी भोसले,स्नेहा झेंडार,सह नळदुर्ग व परिसरातील शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments