प्रतींनिधी ( राम शेळके ) लातूर जिल्ह्यातील बोडका या गावातील सुरेश घाडगे यांनी 2018 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची बोडका नगरीत बांधील वेस तरच कापील केस अशी प्रतिज्ञा केली. आणि त्यांच्या त्यांच्या प्रयत्नाला गावकऱ्यांनी दिलेल्या साथीमुळे यश मिळाले.
सुरेश घाडगे 2011 साली गावात ग्रामपंचायतच्या एससी समाजाला सुटणाऱ्या जागेवर सरपंच पदासाठी निवडणुकीला उभा राहिले परंतु गावातील मनुवादी कृतीच्या लोकांनी त्यांची भाऊजई रत्नप्रभा बाबुराव घाडगे यांना देखील त्यांचे विरोधात उभा केले. निवडणूक झाली त्यामधून सुरेश घाडगे ग्रामपंचायत सदस्य झाले परंतु सरपंच होऊ शकले नाही 2018 ला सुरेश लहाने यांच्या प्रयत्नाने गावातील सर्व ग्रामस्थांना ग्रामसभेमध्ये आपल्या गावाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अशी असायला हवी त्याविषयी त्यांनी लोकांना पटवून दिले ग्रामसभेत सर्वांनी एकमताने ठराव पास करून मंजुरी दिली ही वेळेस बांधायची तर लोकसभागातून बांधायची असा निश्चय देखील केला या निश्चयाला माजी सरपंच श्री जब्बार सय्यद यांनी सपोर्ट केला तर लातूर जिल्ह्याचे माजी खासदार श्री सुधाकर शृंगारे यांनी देखील हातभार लावला आणि यश ज्या ठिकाणी बांधली आहे त्या ठिकाणी बारा फुटी ब्रांच धातूचा पुतळा व संसद भवनाची आकृती चतुरा देण्याचं मान्य केलं.
या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकाऱ्यापासून ते राज्य सरकार पर्यंतच्या सर्व मान्यता श्री सुरेश घाडगे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केल्या आज यश चे काम पूर्ण झाले आहे अजून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं व संसद भवनाच्या आकृती चतुऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे या सर्व कामात गावातील मनोज घाडगे विशाल घाडगे पंकज घाडगे यांच्यासह संपूर्ण बोडका ग्रामस्थांनी सहभाग सहभाग निधी देऊन सपोर्ट केला.

