Thursday, February 26, 2026
Homeतेलंगनाकागजनगर तेलंगना येथे "मीराताई आंबेडकर बौद्ध दीक्षाभूमी" चा 22 वा वर्धापन दिन...

कागजनगर तेलंगना येथे “मीराताई आंबेडकर बौद्ध दीक्षाभूमी” चा 22 वा वर्धापन दिन चा भव्य कार्यक्रम सम्पन्ना.—

मूकनायक रिपोर्टर :- बौद्धाचार्य पूरणसिह बौद्ध

   दि 27 ऑक्टोबर 2024 रविवारला सिरपुर कागजनगर तेलंगणा राज्य मंधे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कागजनगर च्या वतीने "मिराताई आंबेडकर बौद्ध दीक्षाभूमी  चा 22 वा स्थापना दिवस" चा भव्य कार्यक्रम पार पडला,.. 27 ऑक्टोबर 2002 ला,दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय अध्यक्ष्य,  महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी या ठिकाणी हजारो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती...
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद विश्वास जगताप साहेब  तसेच चंद्रपुर येथील भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी,प्रमुख मार्गदर्शक  इंजी नेताजी भरणे,माज़ी जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक, आद कृष्णाक पेरकावार जिल्हा सचिव तथा केंद्रीय शिक्षक आणि आयुनि सपनाताई कुंभारे माज़ी जिल्हा उपढक्ष्या तथा केंद्रीय शिक्षिका,आयुनि  सुजाता ताई लाटकर माज़ी जिल्हा उपाध्यक्ष तथा  केंद्रीय शिक्षिका,आयूनी प्रगती ताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका आणि आयुनि कविताताई अलोने केंद्रीय शिक्षिका,आयुनि उमरे ताई,बल्लारपुर यांचे धम्मप्रबोधन पर मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण "मी रमाई बोलतोय" ही एक पात्री  नाट्यप्रयोग आयुनि गायत्री ताई रामटेके,भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूर शहराचे अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका यांनी अपल्या उत्कृष्ट अभिनयातून पार पाडले. या कार्यक्रमांला  तेलंगणा राज्याचे आमदार मा. दन्डे विठ्ठल साहेब (MLC) प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा च्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान चिन्न देऊन सन्मान करण्यात आला.
 "मीराताई आंबेडकर बौद्ध दीक्षाभूमी"  सिरपूर कागज नगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दहा दिवसीय "श्रामनेर शिबिर" चे आयोजन केलेले होते.  या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद अशोक पेरकावर केंद्रीय शिक्षक तथा लेफ्टनंट कर्नल समता सैनिक दल तसेच श्रामनेर दीक्षा देणारे पूज्य भदन्त धम्म रक्षीत, चैत्यभूमी मुंबई  तसेच  आदिलाबाद,आद. माऊलकर साहेब,जिल्हा अध्यक्ष मांचीरील, आद शंकर चालूरकार  कोषाध्यक्ष,आद अजय रामटेके उपाध्यक्ष,,आद देवजी मुरामड़े, आद दुर्गा प्रसाद मेश्राम,कगजनगर प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सिरपूर मंडल सरचिटणीस आद रमेश डोंगरे साहेब तसेच आयूनी सपना ताई कुंभारे केंद्रीय शिक्षिका चंद्रपुर यांनी आपल्या वक्तृत्व शैलीमध्ये पार पाडले. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने धम्म बाँधवांची उपस्थिती होती. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा,सिरपूर कागज नगर तेलंगणा राज्य चे संपूर्ण पदाधिकारी यांनी खूप कष्ट घेतले….

- Advertisment -

Most Popular

Recent Comments