Thursday, February 26, 2026
Homeनाशिकलष्कराच्या वाहनाच्या धडकेने नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्याचे अपघाती निधन.

लष्कराच्या वाहनाच्या धडकेने नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्याचे अपघाती निधन.

सौ. रेणु गायकवाड -महाले
नाशिक प्रतिनिधी

मिळालेल्या माहितीनुसार 21-12-2023 रोजी पोलीस अधिकारी श्री कुंदन सोनवणे हे आपले कार्यालयीन कामकाज पुर्ण करुन घरी जात असताना वडनेर रोड येथील लष्कराच्या पेट्रोल पंपा नजिक लष्कराच्या गाडीचा धक्का लागल्याने आपल्या दुचाकीसह लष्करी वाहनाच्या पुढील चाका खाली आले व भीषण अपघात झाला, यामध्ये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी श्री कुंदन सोनवणे हे गंभीर जखमी झाले, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ लष्कराच्या जवानांनी त्यांना देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल हि केले परंतु उपचारा आधीच श्री कुंदन सोनवणे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मयत श्री कुंदन सोनवणे हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले, सध्या तरी यासंदर्भात अजून तरी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, तसेच पोलिसांमार्फत हा अपघात कसा झाला याची शाहनिशा होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments