Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रपिरळे ग्राम पंचायतीच्या भोंगळ, मनमानी कारभाराच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन.

पिरळे ग्राम पंचायतीच्या भोंगळ, मनमानी कारभाराच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन.

मुकनायक प्रतिनिधी :-प्रशांत सोनवणे

माळशिरस तालुक्यातील मौजे पिरळे ग्राम पंचायत मार्फत अल्पसंख्याक संवर्गातील घरकुल योजना, बनावट कागदपत्रा नुसार देण्यात आलेली आहे , परंतु त्या यादी मध्ये वरील संवर्गातील लाभार्थ्यांन व्यतिरिक्त दुसऱ्या संवर्गातील काही लोकांची नावे,या मध्ये समाविष्ट करून अनुसूचित जातीचे आहेत असे दाखवून , त्यांना लाभ देण्यात आलेला आहे,याची यादी तयार करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी , पदाधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन आंदोलन कर्ते सभाजी साळवे, नितीन साळवे, बबनराव साळवे व इतर ग्रामस्थांनी सोलापूर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा तसेच पिरळे ग्राम पंचायत , नातेपुते पोलिस ठाण्यात, निवेदनाद्वारे मागणी केली आहे,परतु सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्या कडुन आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याने आज दि ३० नोव्हेंबर २०२३ पासून पिरळे ग्राम पंचायत समोर धरणे आंदोलनास बसलो आहे असे आंदोलन कर्त्यांनी मुकनायक प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments