मूकनायक न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य.
वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटी या संस्थेने यशस्वी दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. प्रत्येक वर्षी संस्था नवीन समाज उपयोगी उपक्रम राबवित असते. या वर्षी वर्धापन दिनी डॉ सुनील वानखेडे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल देहूरोड पुणे येथे भारतातील प्रथम सिकलसेल रिसर्च सेंटर चे उद्घाटन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभांगी ताई वानखेडे स्वागत अध्यक्ष डॉक्टर देवानंद उबाळे होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ दिलीप वाळके व महादानी सावळाराम वानखेडे यांच्या हस्ते रेबिन कापून सिकलसेल सेंटर सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आरोग्य तज्ज्ञ डॉ पवन साळवी,एम ओ एच डॉ अनिल बिऱ्हाडे, एम डी आर्थो. डॉ दत्ता शेटे एम डी. कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ वाळके म्हटले भारत सिकलसेल मुक्त होई पर्यंत कार्य निरंतर सुरू ठेवायचे आहे. संस्थेचे महासचिव बाबासाहेब मोरे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सहसचिव महेंद्र गवई यांनी संस्थेचे मागील ९ वर्षाचा आढावा वैचारिकरित्या मांडले. आयु. सुधीर जावळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन एडवोकेट सुमेध घनवट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता उपस्थित,राजेंद्र पवार,अध्यक्ष संस्थापक बहुजन एकता अंदोलन महाराष्ट्र राज्य, म.राज्य प्रभारी श्रीकृष्ण वाघ,संतोष सुर्यवंशी पुणे जिल्हा अध्यक्ष,पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वानखडे,हेमंत शिंदे पुणे जिल्हा युवाअध्यक्ष,व प्रा.युवराज तिकटे, बामसेप श्रृषीमुनी लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते व बसपा चे नेते सत्यजित साळवे साहेब,व राजेश पवार साहेब,यांनी यशस्वी प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वी केला…

