Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडअजंठानगर येथे वर्षवास समाप्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन..

अजंठानगर येथे वर्षवास समाप्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन..

वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पिंपरी चिंचवड दि. १० नोहेंबर २०२३ काल सकाळी वर्षवास समाप्तीचा कार्यक्रम ११वा. नियोजीत वेळेत सूरू झाला यावेळी प्रथम बूद्ध वंदना पूजापाठाने सूरूवात झाली प्रथम उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते तथागतांना पूष्प वाहीली गेली तसेच मातारमाईच्या व बाबासाहेबांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर रावसाहेब सरोदे यांनी प्रस्ताविकेचे वाचन केले, या वेळी सुत्रसंचलन सुजाता गायकवाड यांनी केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरीनाथ शिरसागर होते. कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून प्रवचनकार उपासिका अश्वीनी फुले, नॅशन न्यूजपेपर “मूकनायकचे” वरिष्ठ पत्रकार आयू. लक्ष्मण रोकडे व डाॅ. खांदे लाभले होते. उपस्थित पाहूण्यांना पूष्प देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच वर्षवासाच्या काळात
बूद्धविहारात काही बौद्धाचार्य घडविण्यात आले अशा सर्व बौद्धाचार्य, उपासक उपासिकांचे ही पूष्प देवून सन्मानित करण्यात आले.
अश्वीनी फुले यांचे प्रवचन उपस्थित उपासक व उपासिका यांनी लक्ष देवून श्रवण केले. त्यांनी बौध्द धम्माची वैशिष्ठे सोप्या भाषेत समजावून सांगितली.
यानंतर डाॅ. खांदे यांनी मांसाहार का करूनये यावर आपले विचार व्यक्त केले.
नंतर नॅशन न्यूजपेपर “मूकनायकचे” वरिष्ठ पत्रकार आयू. लक्ष्मण रोकडे यांनी समाजातील सर्वच म्हणजे सामाजिक, राजकिय, व धार्मीक अशा विविध विषयावर चर्चा करत बौद्ध धर्मियांचा पूजापाठ स्वता करिता नसून तो उपस्थितांन करीता असतो असे सांगीतले यावेळी त्यानी टाळ्या वाजवण्या ऐवजी बौद्धांनी तिनवेळा साधूवाद करावा हे सूचवले व त्याचा अर्थ ही सोप्या भाषेत समजावून सांगीतला उपस्थित सर्वांनी साधूवाद करून रावसाहेब सरोदे यांनी सर्व पाहूण्यांनकरिता आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता अन्नदान वाटपाने झाली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल बनसोडे, अजय जगताप महासचिव भारतीय बौद्ध महासभा, आयु. प्रविण रणबागुल सर, आयु. हेमंत शिंदे, शोभा वाघमारे, वंदना बनसोडे, अर्चना जोगदंड , वाघमारे, लता चव्हाण, पद्मिनी गायकवाड, सुलभा वाळके, आयोध्या सरोदे, सीमा झेंडे, बौद्धाचार्य सुधीर वडमारे, प्रा.सारंग वाघमारे सर, चंद्रकांत जगताप, वंदना जावळेताई, कांता सोनवणे, बौद्धाचार्य रावसाहेब सरवदे, जयराम लांडगे, भिवाजी वाळके, लालचंद जयस्वाल कैलास ससाणे, विजय तायडे, व्यवस्थापक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वार्ड शाखा अजंठानगर कार्यकारणी , सर्व उपासक, उपासिका, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. अन्नदान कर्ते आयु. युवराज कोकाटे साहेब यांचे उपस्थित भोजनदान करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments