मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा
(संस्थापक: बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) राष्ट्रीय संघरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर. कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत धम्मरथ चे आयोजन करण्यात आले. बुधवार दिनांक 8. 11. 2023 रोजी सायंकाळी दौंड तालुक्यातील कुरकुंभ पाटस सरपंच वस्ती गोपाळवाडी संविधान चौक या मार्गाने होते धम्मरथा मध्ये तथागत गौतम बुद्ध यांची भव्यदिव्य मूर्ती ठेवण्यात आली होती धम्मरथ सहभागी पूज्यनीय भिक्यू संघ उपासक व उपासिका समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा व दौंड तालुक्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी यांची उपस्थिती होती बुद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी धम्मरथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आगमन झाले भिक्खू संघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले दौंड तालुका भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने धम्मरथ सोबती भिक्खू संघा यांचे स्वागत करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन करून तसेच पुढे संत गाडगेबाबा स्मारक पुष्पहार घालून व संविधान स्तंभ अभिवादन केले संविधान संवर्धन समिती दौंड अध्यक्ष यांच्यावतीने धम्मरथाचे व भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले बुद्ध धम्मरथाच्या स्वागताच्या सर्व ठिकाणी फटाक्याचे आतिषबाजी व फुलांचा वर्षाव करण्यात आला भिक्खू संघाकडून बौद्ध धम्म चे उपदेश देण्यात आले पुढे धम्मरथ दौंड लुंबिनी बुद्ध विहार राजर्षी शाहू महाराज सोसायटी बालाजीनगर या ठिकाणी मुक्कामी रवाना झाले

