Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड नगरपालिकेचे दोन अभियंता अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात.

दौंड नगरपालिकेचे दोन अभियंता अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात.

दौंड मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले पंतप्रधान आवास योजना प्रकल्प दौंड नगरपालिकेचे अभियंता विजय नाळे व प्रशांत जगताप यांनी घरकुल योजनेचे मंजुरी धनादेश काढण्यासाठी तक्रारदारा कडे 50 हजाराची लाच मागितली होती दिनांक १८/१०/२०२३ रोजी पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना दौंड नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले दौंड नगरपालिकेचे अभियंता विजय नाळे व प्रशांत जगताप घरकुल योजनेची मंजुरी धनादेश काढण्यासाठी तक्रारदार यांना पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती प्रधानमंत्री आवास योजना अभियंता विजय नाळे प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत जगताप असे लाच घेताना पकडण्यात आलेले दोन अभियंताची नावे आहेत सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकार्य यांनी केली दौंड नगरपालिकेतील भ्रष्टाचार बंद होणार का ? दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले काय भूमिका घेतात याकडे दौंड च्या नागरिकांचे लक्ष.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments