Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूर*गडहिंग्लजमधील जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे निधन*

*गडहिंग्लजमधील जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे निधन*

मुकनायक गडहिंग्लज प्रतिनिधी

गडहिंग्लजमधील जनता दलाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. शिंदे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर सुरुवातीला कराडमध्ये तर त्यानंतर पुणे येथे उपचार सुरू होते. गेल्या आठ-दहा दिवसांपासून त्यांची प्रकृती सुधारली होती. काही दिवसात ते गडहिंग्लजला परतणार होते. मात्र, शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शिंदे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आमदारकीपर्यंत आपला प्रवास केला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता दल पिछाडीवर गेले असताना गडहिंग्लजमध्ये मात्र शिंदे यांनी जनता दलाचा करिष्मा कायम ठेवत नगरपालिकेवर वर्चस्व ठेवले होते. त्यांच्या अचानक जाण्याने जनता दल परिवारावर शोककळा पसरली असून समाजवादी परिवारातील कोहिनूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा पार्थिव पुण्याहून रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत गडहिंग्लज येथे आणण्यात येणार असून रविवारी सकाळी ११ वाजता गुड्डाई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments