Thursday, February 26, 2026
Homeबारामती*बारामती परिसरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ॲकॅडमीना लागणार चाप या ॲकॅडमी होणार...

*बारामती परिसरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ॲकॅडमीना लागणार चाप या ॲकॅडमी होणार बंद, सामाजिक कार्यकर्ते मौसीन पठाण*

मुकनायक प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

बारामती शहर परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ॲकॅडमीना आता चाप लागणार आहे ,या मध्ये इमारतींचे फायर ऑडिट न केलेल्या ॲकॅडमी तात्काळ बंद करण्याच्या सुचना तहसीलदार साहेब यांनी बारामती अग्नीशमन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,आज प्रशासकीय पातळीवर बेकायदेशीर ॲकॅडमीबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे अनेक ॲकॅडमी वर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे, बारामती परिसरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर ॲकॅडमीचे पेव फुटल होत, मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्यासह पालक आणि विद्यार्थी यांची पिळवणूक या ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू आहे, याबाबत मोहसीन पठाण यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता, त्या वेळी विविध विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबद्दल निर्णय घेण्याचं ठरविण्यात आल होत,आज बारामती येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीला ,नायब तहसीलदार विलास करे , बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केरकर, गटविकास अधिकारी अनिल बागल, गटशिक्षणाधिकारी सपत गावडे, बारामती नगरपालिकेचे अग्नीशमन अधिकारी पी कुल्लरवार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी , आंदोलन कर्ते मोहसीन पठाण व इतर मान्यवर उपस्थित होते, ज्या ॲकॅडमीने फायर ऑडिट केले नाही आणि ज्यांना नोटीसा देवुन ही ॲडिटच केले नाही अशा ॲकॅडमी बंद केल्या जाणार आहेत, तसेच शिक्षण कायद्यानुसार इमारतींचे ॲडिट नाही अशा ॲकॅडमी बंद करण्याच्या सुचना नायब तहसीलदार विलास करे यांनी दिल्या, ज्या ॲकॅडमी बेकायदेशीर बस चालवतात त्यांच्यावरही कारवाई सुरू असल्याच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले, अनेक ॲकॅडमी कडुन शासनाचा कर मोठ्या प्रमाणात बुडविला जात आहे, त्याबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली ,या बद्दल संबंधित विभागाकडुन संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला, एकुणच आजच्या बैठकीत विविध शासकीय विभागांकडून ॲकॅडमीच्या मनमानी वर चर्चा करून कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे बेकायदेशीर ॲकॅडमीना चाप बसणार आहे,
*जिल्हा* *शिक्षण* *अधिकारी* *यांची* *अडचण* *काय*??
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीबद्दल सुचना देण्यात आल्या होत्या, परंतु त्या या बैठकीला गैरहजर होत्या , त्या नेमक्या कोणत्या कारणामुळे आल्या नाहीत या बद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments