मुकनायक प्रतिनिधी :-प्रशांत सोनवणे
मुंबई,दि ८ रोजी दादर मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान समर्थन यात्रा दि २४ सप्टेंबर पासून दिक्षा भुमी नागपूर येथुन सुरू होईल संपुर्ण महाराष्ट्राभर यात्रा निघणार आहे या यात्रेची सांगता दि ६ डिसेंबर रोजी चैत्य भुमी दादर मुंबई मुंबई येथे होईल , त्या वेळी आंबेडकर घराण्यांचे कट्टर समर्थक समाज भूषण मा काकासाहेब खंबाळकर साहेब याची रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड चे पत्र सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी ,
तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढील प्रमाणे,
प्रदेश उपाध्यक्ष लोकनेते विजयराव वाकोडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय देखने, उपाध्यक्ष प्रा.विनायक दुधे, महासचिव प्रा.युवराज धसवाडीकर, सचिव श्रीपती ढोले,संघटक भैय्यासाहेब भालेराव, प्रदेश सचिव माधवराव जमदाडे, प्रदेश प्रवक्ते वसंतराव कांबळे, प्रवक्ते प्रा.विजय घोरपडे
यांची निवड करण्यात आली, दि ११ ऑक्टोंबर रोजी संविधान समर्थन यात्रा पुण्याहून अहमदनगर कडे रवाना होणार आहे त्या वेळी दौंड शहरातुन जाणार असल्याने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा काकासाहेब खंबाळकर साहेब यांनी रिपब्लिकन सेनेचे मा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिलजी साळवे साहेब, मा पुणे जिल्हा आनंदजी बगाडे साहेब , प्रशांत सोनवणे पुणे जिल्हा अध्यक्ष, गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष , तुषार गायकवाड पुणे जिल्हा युवा निरीक्षक , सचिन साळवे दौंड ता अध्यक्ष यांच्या वर सर्व जबाबदारी देण्यात आली आहे.

