Thursday, February 26, 2026
Homeनांदेडनांदेड मध्ये आरक्षण हाक्क संवर्धन समिती महाराष्ट्र वतीने महिलांचे आमरण उपोषण.

नांदेड मध्ये आरक्षण हाक्क संवर्धन समिती महाराष्ट्र वतीने महिलांचे आमरण उपोषण.

मूकनायक प्रतिनिधी :- विजय बगाडे

आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने दिनांक 2. ऑक्टोबर पासून आयटीआय कॉर्नर माता सावित्रीबाई फुले स्मारक नांदेड येथे आमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्ते मध्ये तीन महिलांचा व एक पुरुष समावेश असून महिला शितल भवरे यांची प्रकृती खालावली आहे त्यांनी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे उपोषणकर्ते नावे पुढीलप्रमाणे शितल भवरे कावेरी ढगे प्रियंका कदम तरूण्णॄम महम्मद बेगम विनोद वाघमारे असे असून.
महाराष्ट्र सरकारने कंत्राटी पद्धतीने 1)कंत्राटी नोकर भर्ती (6 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णय रद्द करावे 2) ओ, बी, सी आरक्षणास घटनात्मक संरक्षण द्यावे 3) महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढ व दर महिण्यास शिष्यवृत्ती द्यावी 4) दत्त्क शाळा योजना 18 सप्टेंबर 2023 चे परिपत्रक द्यावे 5) खोटे जात प्रमाणपत्र काढणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी असे आरक्षण हाक्क संवर्धन समिती महाराष्ट्र वतीने असे निवेदनता उपोषणकर्ते मागण्या शासना कडे केल्या आहे निवेदन दिनांक 25/ 9/ 2023 देऊन 2 ऑक्टोबर 2023 उपोषण सुरू ठेवले आहे तरी महाराष्ट्र शासन उपोषणकर्ते मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे
उपस्थित असलेले आरक्षण हक्क संवर्धन समितीचे संघटक श्याम निलंगेकर,लता बंडगर,विलास भालेराव, एडवोकेट प्रशांत कोकणे दलित सेनेचे राज्य संघटन सचिव संजय वाघमारे,भीम प्रहार चे दीपक पवळे, प्रमोद वैद्य, माजी प्राचार्य गिरीश औचौडेकर,यशवंत ढगे, प्राध्यापक देविदास इंगळे,अदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments