Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूर*करंजगांव ग्रामस्थांचा सत्याग्रही धरणे आंदोलनाचा इशारा*

*करंजगांव ग्रामस्थांचा सत्याग्रही धरणे आंदोलनाचा इशारा*

मुकनायक चंदगड प्रतिनिधी – राहुल कांबळे

करंजगांव, ता.चंदगड, जि.कोल्हापुर कडील ग्रामपंचायतीच्या मनमानी व ढोबळ कारभाराविरोधात वारंवार तक्रारी व पुरावे सादर करुनही ८-९ महीने उलटुन गेले तरीही अद्याप कोणत्याच तक्रारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही.याच्या निषेधार्थ संजय रामु गावडे, अनिल नारायण गावडे, मारुती सावंत, अशोक गावडे, रामु कांबळे, गोपाळ दळवी, अंकुश कांबळे, शंकर गावडे आदीं ग्रामस्थांनी दि. १७/१०/२०२३ पासुन ग्रामपंचायत करंजगांव कार्यालयासमोर सत्याग्रही धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक, करंजगांव यांना आज रोजी दिले आहे.

सविस्तर माहीती अशी की,
ग्रामपंचायत करंजगांव कडे जलजीवन योजनेच्या माध्यमातुन नळ जोडणी मागणी करुनही अद्याप पुर्तता केली गेली नाही, ग्रामपंचायत निवडणुक प्रकियेमध्ये सदस्या अर्चना शिवाजी गावडे यांनी व सरपंच व ग्रामपंचायत कार्यकारणी यांनी एकमेकांच्या संगनमताने २ पेक्षा जास्त अपत्ये असुनही खोटी माहीती सादर केली आहे, ग्रामसेवक क्लार्क सरपंच व कार्यकारीणी यांचा मनमानी आर्थिक कारभार बाबत, दिलेल्या तक्रारींच्या रागातुन व राजकिय रागातुन घरासमोर करणी भानामती करणे , नियमित पाणी पुरवठा न करणे , अंतर्गत रस्ते गटर्स स्ट्रेट लाईट आदी बाबत तक्रारीवर पुरावे सादर करुनही अद्याप कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments