Thursday, February 26, 2026
Homeदौंडमहार रेजिमेंट स्थापना दिवस दौंड शहरात उत्सवात साजरा केला.

महार रेजिमेंट स्थापना दिवस दौंड शहरात उत्सवात साजरा केला.

दौंड मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे.

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे 1 /ऑक्टोंबर 1941 रोजी बेळगाव येथे पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना केले त्याचा पार्श्वभूमीवर दौंड मध्ये आज दिनांक १/१०/२३ रोजी दौंड शहरातील माजी सैनिक हनुमंत लांडगे अनिल खणसे दत्तात्रय पवार शंकर जगताप सर्व माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते पॅंथर जयदीप बागडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली दौंड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून यावेळी दौंड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पक्ष संघटना एकत्र येऊन महार रेजिमेंट स्थापना हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी माजी सैनिकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संजय कांबळे पत्रकार रमेश चावरिया श्रीकांत थोरात प्रकाश सोनवणे निलेश बगाडे मनोज गायकवाड नितीन गाडे अर्जुन गायकवाड पांडुरंग गडेकर सुधीर वाघमारे विठ्ठल शिपलकर श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments