मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे
दौंड न.पा.मुख्याधिकारी डाॅ संतोष टेंगले यांना RTI कार्यकर्ते जयदीप बगाडे व त्यांच्या सहकार्य यांनी दिले.
२० सप्टेंबर २००८ रोजी शासन परिपत्रक काढले आसून सुधा त्याची अंमलबजावणी सरकारी कार्यालयात होत नाही. माहिती अधीकार दिनाच्या अनुषंगाने सर्व सामान्य जनतेला माहिती अधीकार कायदा २००५ समजण्यास सोपा जावा व त्या कायदयाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हया उदेशाने २८ सप्टेंबर माहिती अधीकार दिन म्हणून साजरा करावा. या वेळेस शासनाने जनतेला सखोल कायदया विषयी माहिती द्यावी. परिपत्रकात नमुद केल्या प्रमाने निबंध,वक्तृव्य आणि व्याख्यान, कायद्याची माहिती जनतेला सांगावी. अशी मागणी यावेळी RTI कार्यकर्ते जयदीप बगाडे यांनी व त्याच्या सोबत योगीता रसाळ, हनुमंत लांडगे, विठ्ठल शिपलकर, सूर्यवंशी यांनी केली. तसेच यावेळी २८ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्या मुळे हा दिवस २७ सप्टेंबर किंवा २९ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करावा अशी मागणी केली आहे.

