Thursday, February 26, 2026
Homeबारामतीबारामती मध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.

बारामती मध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.

मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे

बारामती: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, तसेच प्रदेश अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांच्या सुचने नुसार पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या प्रयत्नातून आज मुस्लिम समाजातील युवक जाफर कुरेशी, हाजी इनाम सय्यद, शाकिब शकीर कुरेशी यांनी केला वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश वंचित बहुजन आघाडी या पक्षाची कामाची पद्धत, पक्षाची ध्येय धोरणे, गोर गरीब वंचित घटकांना पक्ष करत असलेली मदत, मुस्लिम समाजावर समाज कंटकान कडून होत असलेल्या अन्यायला श्रदेय बाळासाहेब आंबेडकर देत असलेला आधार तसेच पक्षाचे विविध उपक्रम पाहून मुस्लिम युवकांनी उत्साहाने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्याकडे व्यक्त केली होती त्यानंतर आज मोठ्या उत्साहाने त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार साहेब व महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या उपस्थितीत प्रवेश करुन त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब व जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बारामती शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, शहर सचिव विनय दामोदरे, बारामती तालुका सहसचिव कृष्णा साळुंके, बारामती तालुका संघटक आनंद जाधव, सनी साळूंके आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments