मूकनायक दौंड प्रतिनिधी: विजय बगाडे
दिनांक २७/०८/२०२३ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त *खोरवडी* येथे वंचित बहुजन आघाडी चे शाखा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये मोठ्या संख्येने भीमसैनिक व खोरवडी ग्रामस्थ ढोल ताशा आणि आतिषबाजीच्या गजरात व डीजेच्या सुरात हा शाखा उदघाटन पार पडला, यावेळी वांचीतचे तालुकाध्यक्ष *अश्विन (भाऊ) वाघमारे* यांच्या हस्ते फलकाचे उदघाटन करण्यात आले व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मिरवणुकीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ता. सचिव *अजिंक्य गायकवाड* , शहराध्यक्ष *सैफ (भाई)मन्यार,* शहर महासचिव *अक्षय शिखरे,* शहर सचिव *राहुल नायडू,* शहर सचिव सोहन शिंदे, टोनी (आद्रस)जगताप यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन ता सचिव संजय जाधव यांनी केले तर ता अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सरकारच्या काळात दलित मुस्लिम ख्रिश्चन अशा बहुजनांवरती अन्यायाचे सत्र वाढलेले आहेत तर येणाऱ्या काळात या सरकारला मतदानाच्या स्वरूपात त्यांची जागा वंचित बहुजन आघाडी दाखवेल असं प्रतिपादन यावेळी करण्यात आले. यावेळी भीमक्रांती सेनेचे अध्यक्ष *बंटी (भाऊ) वाघमारे*, *प्रभाकर (भाऊ) पोते* , आमीन भाई शेख, इब्राहिम भाई शेख, शहर संघटक अनिकेत जाधव, अमोल वाघमारे, राजरत्न शिंदे, आकाश गायकवाड, चेतन माने, प्रवीण भालेराव, शिवम जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ग्रामीण भागातून *कडेठाण – सिद्धार्थ रणधीर, कारण रणधीर. वरवंड – विशाल दामोदरे* उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या शाखेसाठी ज्यांनी पुढाकार घेतला असे *मा. भाऊसाहेब सकट, शंकर जगताप, अमोल मोरे* खोरवडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश जाधाव यांचा सत्कार या वेळी झाला.
तरी खोरवडी शाखेची कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
अध्यक्ष: अमोल भाऊसाहेब सकट
उपाध्यक्ष – आकाश राजु डोरले, दत्ता सुरेश सकट
सचिव – ज्ञानेश्वर बबन शिंदे, आबा संभाजी दगडे
संघटक :- श्री. नितीन शंकर सकट
महासचिव : दादा चंद्रकांत बाबर, अमित हौशाबापू गुन्नर सल्लागार : तानाजी उत्तम कांबळे, गोरख जगन्नाथ सोनवणे, विशाल बाळू जाधव, बट आकाश ननवरे, मल्हारी सकट, इब्रान शेख, नामदेव धावडे, अनिल सदगर. कार्यक्रमावेळी अनेक कार्यकर्ते भीमसैनिक व खोरवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

