Thursday, February 26, 2026
Homeअमरावती*युवकांची फळी निर्माण करुन रिपब्लिकन सेना मजबूत करा.. किरणजी घोंगडे साहेब

*युवकांची फळी निर्माण करुन रिपब्लिकन सेना मजबूत करा.. किरणजी घोंगडे साहेब

मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे

अमरावती दिं.२७

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर १० स्पटेंबर रोजी सभेच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत.
सभेच्या पुर्व तयारीसाठी रिपब्लिकन सेना युवा आघाडीचा वतीने अमरावती शासकीय विश्रामभवन येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे उपस्थित होते.
यावेळी पाहुणे म्हणून युवा प्रदेश महासचिव देवेश पातोडे, अकोला जिल्हा संघटक संजय डोंगरे, हिंगोली युवा जिल्हा संघटक महेंद्र घोंगडे, अमरावती महानगर अध्यक्ष प्रविण सरोदे , अमरावती महिला शहराध्यक्ष वैशाली काळे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक अमरावती युवा जिल्हाध्यक्ष गोपाल ढेकेकर यांनी केले.
पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना किरण घोंगडे म्हणाले की रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब हे पायाला भिंगरी बांधून सर्व भारत पिंजून काढुन युवकांना सत्तेत पोहचवण्यासाठी काम करीत आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असुन उच्च आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
तेंव्हा सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब अमरावती लोकसभा लढणार असल्याचे ग्रुहीत धरुन कामाला लागावे असे आवाहन केले.
तसेच निवडणुकीत युवा वर्ग महत्वाचा मतदार असतो तेंव्हा रिपब्लिकन सेनेत युवकांची गावागावात बांधणी करुन युवकांची फौज तयार करावी व होऊ घातलेली १० स्पटेंबर रोजीची माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांची सभा यशस्वी करने हि प्रत्येक कुटुंबामधील व्यक्तीची जबाबदारी आहे असे समजून काम करावे असे आवाहन पदाधिकारी यांना संभोदीत करताना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केले.
बैठक यशस्वी होण्यासाठी युवती सेना शहराध्यक्ष निताताई वरगड , विधानसभा युवती अध्यक्ष सारीता ताई खंडारे , शहर उपाध्यक्ष सोनाली वानखेडे,,शहर सचिव किशोर पानेकर, साहेबराव मेश्राम, गौतम प्रधान, राष्ट्रपाल घरडे, प्रकाश गवई यांनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने युवक,युवती आघडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments