दौंड मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे
दौंड- विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची नात यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात भीम अनुयायांच्या जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा चौक येथील राजगृह बुद्ध विहार त्रिशरण पंचशील वंदना घेऊन राजगृह बुद्ध विहार पासून पुढे मोर्चाला सुरुवात झाली महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून सम्राट अशोक स्तंभ चौक दौंड पोलीस स्टेशन संगता करण्यात आला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची नात डॉक्टर भावना गायकवाड (धुमाळ) यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात डॉक्टर सदानंद धुमाळ यांच्याकडून पत्नी डॉ भावना गायकवाड (धुमाळ) यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला डॉक्टर भावना गायकवाड (धुमाळ) यांना जातीवाचक शब्द वापरून सतत अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केली डॉक्टर सदानंद धुमाळ यांनी डॉक्टर भावना गायकवाड लग्नानंतर (धुमाळ) या कायदेशीर पत्नी असताना देखील त्यांनी त्यांच्या प्रियसीला घरात आणून स्वतःच्या बायको समोर प्रियसी बरोबर अश्लील चाळे करून डॉक्टर भावना गायकवाड (धुमाळ) यांना मानसिक त्रास दिला व सोबत त्यांच्या मुलीस देखील मारहाण केलेली आहे त्यामुळे अशा लिंग पिसाट डॉक्टर सदानंद धुमाळ यास कडक शासन झालीच पाहिजे सदर गुन्ह्यातील डॉक्टर सदानंद धुमाळ दौंड पोलीस स्टेशन येथे उपस्थित असताना देखील पोलिसांनी अटक न करता त्यास सोडून देण्यात आले या करीता कर्तव्यस कसून करून आरोपीस मदत करून पलायन करणेकामी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दौंड पोलीस स्टेशन येथे मागासवर्गीय महिला डॉक्टर भावना गायकवाड (धुमाळ)यांची तक्रार घेण्यास ११ तास विलंब केल्याने संबंधित अधिकार्यावर व दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार श्री विट्ठल गायकवाड मागासवर्गीय डॉक्टर भावना गायकवाड (धुमाळ) यांची तक्रार न घेता त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ केली व त्या ठिकाणी हाकलून दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी डॉक्टर सदानंद धुमाळ यास सहकार्य करणारी त्यांची प्रेयसी व सहकारी व तिला पाठीशी घालणाऱ्यावर ॲ्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा नागरिक हक्क संरक्षण कायद्याच्या अंतर्गत डॉक्टर सदानंद धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा दिनांक १४/०८/२०२३ रोजी दौंड पोलीस स्टेशन मधील सकाळी ८.३० वाजता ते रात्री ११.०० वाजेपर्यंत डॉक्टर भावना गायकवाड (धुमाळ) यांना दौंड पोलिसांनी अमानुषपणे वागणूक दिली आरोपी सदानंद धुमाळ यांच्यावर महिला अत्याचार प्रकरणी तसेच अमानुष मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देणे तसेच. जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून त्यास तुरंत अटक करण्यात यावी वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास दौंड बंद करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आंदोलन कार्यकर्ते भाषणामध्ये सांगितले दौंड वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन निवेदनामध्ये आंदोलनकरिते नमूद करून सह्या केल्या पी.आर.पी.पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे पी.आर.पी.पुणे दौंड तालुका अध्यक्ष राजू जाधव पी.आर.पी. दौंड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे पी.आर.पी. पुणे जिल्हा सचिव संजीव आढाव पी.आर.पी. दौंड शहर कार्याध्यक्ष संजय गायकवाड पी.आर.पी. कार्याध्यक्ष सुनील थोरात. पी.आर.पी. दौंड शहर युवक अध्यक्ष किशोर पाटोळे सागर उबाळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागसेन धेंडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत सरोदे अश्विन वाघमारे सचिनभाऊ खरात डाळिंबे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

