Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*पिईएस दलालांच्या विळख्यातून मुक्त करून एस.पी.गायकवाडाचीं नांगी ठेचण्याचा आंबेडकरी समाजाचा निर्धार .....

*पिईएस दलालांच्या विळख्यातून मुक्त करून एस.पी.गायकवाडाचीं नांगी ठेचण्याचा आंबेडकरी समाजाचा निर्धार .. किरण घोंगडे*

मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे

सरसेनानी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या ताब्यात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “पिपल्स एज्युकेशन सोसायटी” मध्ये धुडगूस घालुन अनाधिकृतरित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीजेपीचा दलाल एसपी गायकवाड व त्यांचे हस्तक हरामखोरांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्या कृतीच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन दि.१६/८/२०२३ रोजी दु:२: ००वाजता स्थळ:नालंदा बुद्ध विहार सिडको, नांदेड येथे करण्यात आले होते.
बैठकिच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे होते तर आयोजन उत्तर जिल्हाध्यक्ष संदीपजी माजंरमकर यांनी केले होते.

पिंपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा घेऊ पाहणाऱ्या एस.पी. गायकवाड व त्यांचे बगलबच्चे यांना धडा शिकवला जाईल अशा इशारा युवा प्रदेशाध्यक्ष किरणजी घोंगडे साहेब यांनी दिला.
तर गायकवाडांना जाब विचारण्यासाठी लवकरच मोर्चाचे आयोजन करणार असल्याचे उतर जिल्हाध्यक्ष संदीप माजंरमकर यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष शंकर थोरात,मराठवाडा युवा निरिक्षक नितीन बनसोडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे,द.युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते यांची भाषणे झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा जिल्हाध्यक्ष उत्तर विशाल वाघमारे,बंटी कंधारे, कुणाल भुजबळ,मुखेड युवा शहराध्यक्ष पप्पू सोनकांबळे, मोहन पवळे ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष द. गवळनताई कदम ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उ. छायाताई शिंदे, जिल्हा महासचिव संगीता ताई पवळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक महिलांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश घेतला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments