मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
दि. १५ रोजी ( ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अकलुज येथे मा अक्षय जाधव व त्याच्या सहकारी मा वल्लभं माने ,मा राहुल चौगुले ,मा लखन बेद्रे यानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,
सामाजिक स्वातंत्र्य रुजवणे युवकांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे, हे बघा तरुणांनो १४५ कोटी कुठे आहेत?काय करतात? कुठे कोणत्या मार्गाने जातात?
हे पाहू नका आपण ठरवले पाहिजे की, खऱ्या अर्थाने आपल्या देश बांधवांना स्वातंत्र्य मिळवून देयच आहे,
त्याग आणि सेवा हेच खरे आपल्या भारतीयांचे आदर्श आहेत.
खरे स्वातंत्र्य टिकवून व रुजवण्यासाठी बंधुत्व पेरणे फार गरजेचे आहे आणि ऐक्यावर आधारीत समता मिळवून घेणे फार गरजेचे आहे…! आपल्यासाठी क्रांतिकारी म्हणून जगण्याची संधी लाभली आहे पुरेपूर लाभ घेऊत..
उत्साहात लढूत, जोशात लढूत…! असे अक्षय जाधव म्हणाले
या हेतूंनी आज अकलूज मध्ये ऐक्य पेरण्यासाठी पैम्फलेट वाटून व बिटल्स/हिप्पी (कौशल्यात्मक कला फक्त) संस्कृतीक धर्तीवर अकलूज मध्ये गाणी व स्लोगन असा कार्यक्रम आखून हेतू पार पाडला…!
एक व्हारे एक व्हा..!
धर्म सोडून एक व्हा,
जात सोडून एक व्हा..!
इंकलाब जिंदाबाद
इंडियन युनिटी जिंदाबाद,
यंगस्टर युनिटी जिंदाबाद,
स्टुडेंट युनिटी जिंदाबाद,
पैम्फलेट स्वरूप….!
इंडियन युनिटी जिंदाबाद…!
असलेले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल, सामूहिक ऐक्य जर खरे खुरे हवे तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हीच तीन तत्वे आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे, आपण सर्वांनी प्रथम आज शपथ घेतली पाहिजे की भारताला ऐक्यात आणले पाहिजे, ऐक्यात आड येणाऱ्या धार्मिकता व जातीयता, पंथीयता, प्रांतीयता अश्या अनेक संकुचीत प्रवृत्या झटकून टाकल्या पाहिजेत. आज आपणास कोणीही रोखू शकणार नाही भारताचे आणखी ऐक्य बनवण्यासाठी.
यंगस्टर युनिटी जिंदाबाद,
मित्रांनो, माझा तुमच्या बंधुत्वाचा संबंध आहे, तुमच्या जीवनात माझे जीवन आहे. तरुणांनो त्याग व सेवा हे भारताचे आदर्श आहेत हे आदर्श उत्कटतेने जीवनात आणावे. संपूर्ण भारतास कल्याणकारी लढाऊ पाहिजे असल्यास युवकां शिवाय कोण बलिदान देईल? आपणास लढाऊ हवेत तर तरुणांकडेच पाहावे लागेल.
भारताचे भविष्याचे भाग्यविधाते तरुणच तर आहेत. जग भरातील परिवर्तनाच्या इतिहासाची पान उलटून बघितले तर त्यात तरुनांची परिवर्तनवादी व त्यागी वर्णने आढळून येतील. प्रत्येक तरुण सहायक असावा, मानव व मानवतेला मैत्रीच्या रज्जूनी जोडण्यासाठी, प्रेम, सहानुभूती व सहकार्य यांच्या द्वारेच चांगले काही तरी करता येईल, भारतीयांवर जर पुन्हा आपण प्रेम करू लागलो तर भारताच्या परिवर्तनवाद्या चेतना पुन्हा जाग्या होतील…!
फंडामेंटल ह्यूमन राईटस जिंदाबाद,
प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळणार व भारत यशस्वी होणार नाही, गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर अधिक स्वातंत्र्या ची वाढ होईल.
शिक्षणावर राष्ट्रीय उत्पनाच्या ६-७% खर्च करण्याची गरज आहे, फक्त ३- ३.५ % खर्च केला जातो तो आणखी व्हायला हवा,
त्याच प्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५% खर्च आरोग्यावर करण्याची गरज आहे. तरी खर्च करण्याची टक्केवारी १-१.५% इतकिच तोही वाढवायला हवा…!

