Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडयमुनानगर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण

यमुनानगर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण

पिंपरी, दि. 13:- यमुनानगर रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने आणि टाटा ब्लुस्कोप कंपनीच्या सौजन्याने यमुनानगर रुग्णालयातील नवीन बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
या लोकार्पण कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, टाटा ब्लुस्कोप कंपनीचे रतन अजय, सी. आर. कुलकर्णी, निळकंठ पोमण, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, बाळासाहेब रोकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, यमुनानगर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नासिर अलवी, डॉ. संध्या भोईर, सचिन चिखले, उत्तम केंदळे, सुमन पवळे, कमल घोलप आदी उपस्थित होते.
फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर, सेक्टर क्र. १३ मध्ये महानगरपालिकेचे रुग्णालय आहे. सदर ठिकाणी नव्याने रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी अडचण येत असल्यामुळे तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी स्थापत्य विभागामार्फत जोत्यापर्यंतचे बांधकाम करण्यात आले होते. सदर जोत्यावरील स्ट्रक्चर टाटा ब्लुस्कोप कंपनीकडून सीएसआरच्या माध्यमातून प्रिफेब्रिकेटेड क्लिनीक स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी, सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार यमुनानगर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नासिर अलवी यांनी मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments