ठाणे जिल्हा प्रतिनिधी -राजरत्न जाधव
खरं तर भारतातील डावे- उजवे सर्व पक्षीय सामाजिक वैचारिक राजकीय – राष्ट्रीय कार्यकर्त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे की राष्ट्राची समतोल राखणारी मानवी सांस्कृतिक अस्मिता टिकवायची असेल तर ईथे हिंदू असो की मुसलमान किंवा बौद्ध सर्वांनी समानतेच्या वाटेवर चालताना आपल्या सामाजिक गतिविधि मधे काय गोष्टी आडव्या येतात हे पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम जातीवाद, धर्मवाद, भेदाभेद, अंधश्रद्धा ह्या सर्व गोष्टींमुळे देशात प्रगती सोडा स्वेच्छेने काही युवकांना उद्योग निर्माण करावा अशी मानसिक स्थिती सुद्धा निर्माण होत नाही. आज देशात कनिष्ठ वर्गातील जमाती ह्यांना वर आणण्यासाठी समानतेमध्ये बसवण्यासाठी आरक्षणाची गरज कधीच पडली नसती जर ह्या देशात जातीच निर्माण झाल्या नसत्या. ह्या जातीपातीच्या रनयुद्धात काही वरचा वर्ग आजसुद्धा इतर समाजाची व्यवसायापासून, सामाजिक अवहेलनेपर्यंत व्यवहारिक -मानअपमानाची लढाई गावखेड्यावर, कार्यालयात, व इतर ठिकाणी खेळत असतो. आणि त्याचा परिणाम सामाजिक संतुलनावर नेहमीच पडतो. जाती आणि प्रजाती ह्या प्राण्यांमध्ये _ पक्षांमधे असतात कारण त्यांच्यात त्यांची शारीरिक हालचाली उडण्याची बसण्याची, खानपानाची अवस्था फारच वेगळी असते आणि आहार सुद्धा, मात्र माणूस हा स्वाभाविक हालचाली आणि वागणुकीत बहुतांशी मिळताजुळता असतो त्यामुळे कान नाक अशा शारिरीक ढबीमध्ये माणूस हा एकाच रचनेत मोडतो.परंतु एकहाती वर्चस्वाच्या लढाईत एकदुसऱ्याला हिणवण्याच्या आणि गुलाम बनवण्याच्या नादातुन आपण आपल्यातच भेदाभेदीचे वर्ग निर्मित करून हजारो वर्षाची अमानवीय परंपरा संस्कृतीत कायमची रुजवली आणि अशा सर्व गोष्टीचा गुंता आपल्याच देशात राहणाऱ्या ब्राह्मण्य वादी विचारवंतानी ग्रंथ शास्त्राच्या आधारे पूर्ण भारतभर पसरवून ठेवला आहे. ह्या गोष्टी दुहि आपण कधी संपवणार आहोत.
जोपर्यंत बहुजन समाज जातीअंताची लढाई हातात घेऊन आपल्यात असलेल्या कु जातीप्रथेला विरोध करणार नाही तोपर्यंत आरक्षणाची संकल्पना अशीच समाजात भ्रमण करत राहणार… आणि पुढे जाऊन वादाचे यादवी शंख नक्कीच पेटत राहतील ह्याला सर्वस्वी परकियांपेक्षा आपल्या भारतीय समाजाची सामाजिक व्यवस्था जबाबदार आहे. जोपर्यत आपण आपल्या संस्कृतीचे व्यवस्थित सामाजिक पातळीवर व्यवहारिक, देवागघेवाण, जगण्यासबंधी आकलन करणार नाहीत तोपर्यंत ही वादळे अशीच पेटत राहणार आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षाच्या काळानंतर सुद्धा काही नवनिर्माण करणाऱ्या राष्ट्रांपेक्षा आपण जातीपाती, धर्मवादी लढायांमध्ये गुंतून वैचारिक मागासलेपणाचे उदाहरण स्वतः च निर्माण करत राहणार अंततहा विकसित होण्यापेक्षा विकसनशील देशाच्या वर्गवारीत नक्कीच मोडणार.
मूकनायक राजरत्न जाधव ✍️
ठाणे जिल्हा ब्युरो चीफ

