मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
दिनांक ८/८/२०२३ रोजी ग्रामविकास अधिकारी यांचे कडे लेखी पत्राने ग्रामपंचायत निधीतून व सरकारी निधीतून गावासाठी बांधलेल्या विरंगुळा केंद्र सर्वसामान्य जनतेसाठी खुले करा असे कळविले होते परंतु आज दिनांक ११ /८/ २०२३रोजी त्यांना ग्रामविकस अधिकारी सुरेखा पोंदकुले याना या संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी त्याचे उत्तर न देता मंगरूळ पणे तिथून निघून गेल्या कारण त्या इमारतीच्या चाव्या पुढार्यांकडे आहेत ग्राम विकास अधिकारी पोंदकुले मॅडम फक्त गाव पुढारी सांगतील असेच वागत आहेत त्यांच्या तालावर नाचत आहेत तसेच ती विरंगुळा केंद्र इमारत गाव पुढाऱ्यांना राजकीय सभा भाषणे या साठी बहाल केले आहे तसेच ग्रामविकास अधिकारी हे गावातील लोकांशी उद्धटपणे बोलत व वागत असले ग्राम विकास अधिकारी यांच्यावर अशा वागणुकीबाबत कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी माननीय गट विकास अधिकारी यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे या बाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री , जिल्हाधिकारी याना ही निवेदन दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कुमारी प्रियांका देवकाते यानी मुकनायक प्रतिनीधीशी बोलताना दिली.

