Thursday, February 26, 2026
Homeदौंड*नाभिक समाजाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करावी....

*नाभिक समाजाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करावी. महाराष्ट्र नाभिक महामंडळ दौंड यांची मागणी.*

मूकनायक दौंड प्रतिनिधी:
विजय बगाडे

*लवकरात लवकर न केल्यास समाज रस्त्यावर उतरेल.*

दौंड – ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय भयानक प्रकारे दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला असणाऱ्या कु. नीलिमा सुधाकर चव्हाण वय 24 हिच्यावर 29 7 2023 रोजी कामावरून घरी परत येत असताना तिचे अपहरण करण्यात आले व तिच्यावर अत्याचार करून नंतर तिच्या डोक्यावरील केस काढून चेहरा विद्रूप करून तिचा खून करण्यात नंतर मृतदेह दाभोळ येथील खाडीमध्ये टाकून देण्यात आला व शोधाशोध करत असताना 1 8 2023 रोजी खाडीत दिसून आला अशा क्रूरपणे हत्या करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी ह्या गरीब कुटुंबातील मुलीला त्वरित न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ दौंड संघटना रस्त्यावर उतरेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील अशी मागणी करण्यात आली व त्याचे निवेदन मा पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन दौंड यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ दौंड गणेश उत्तम साळुंखे यांच्या सहीचे लेटर तसेच महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे अध्यक्ष सुभाष आप्पा जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष मारुती आप्पा पंडित, तालुका अध्यक्ष गणेश साळुंखे शहराध्यक्ष, रवींद्र बंड, ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव साळुंखे, बबन जाधव, शिवाजी साळुंखे, गोरख साळुंखे, रुपेश बंड, नागेश जाधव, विशाल शिंदे, निलेश काळे, मोहन ताटे, राजेंद्र गायकवाड,श्रीकांत राऊत तसेच नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments