Friday, November 20, 2026
Homeमुंबईबुद्धाचा धम्म वैज्ञानिक आहे; धम्माच्या मार्गाने समाजाचा विकास करा”.... डॉ. एस. के....

बुद्धाचा धम्म वैज्ञानिक आहे; धम्माच्या मार्गाने समाजाचा विकास करा”…. डॉ. एस. के. भंडारे

मूकनायक विशेष…. मुंबई ब्युरो चीफ प्रकाश लांडगे

9920806563

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर विषमतेचे जीवन जगणाऱ्या आपल्या पूर्वजांना समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्म हा विज्ञानवादी असून त्यामध्ये देव, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग यांसारख्या अंधश्रद्धांपेक्षा समता, नैतिकता आणि माणसाने माणसाशी कसे वागावे, तसेच दुःखातून मुक्ती कशी मिळवावी याचा मार्ग सांगितला आहे. त्यामुळे बुद्धाचा धम्म वैज्ञानिक आहे. सर्वांनी धम्माचा स्वीकार करून विकासाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे,” असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी केले.

चेंबूर येथील पंचशील नगर शाखेच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन मालिकेत शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी ‘बौद्ध धम्म आणि विज्ञान’ या विषयावरील द्वितीय पुष्पाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य कार्यालयीन सचिव तथा केंद्रीय शिक्षक बापूसाहेब निकाळजे यांच्या प्रबोधनाचा लाभ घेण्यासाठी आणि शाखेला भेट देण्यासाठी ॲड. डॉ. एस. के. भंडारे उपस्थित होते.यावेळी केंद्रीय शिक्षक बापूसाहेब निकाळजे यांनी “बौद्ध धम्म आणि विज्ञान” या विषयावर सविस्तर प्रबोधन केले. विज्ञानाच्या कसोटीवर बौद्ध धम्म कसा खरा उतरतो, बुद्धांच्या विचारांमध्ये तर्क, निरीक्षण, कारण-परिणाम आणि मानवी कल्याणाला कशाप्रकारे महत्त्व देण्यात आले आहे, याची विविध उदाहरणांसह माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.याप्रसंगी शाखेच्या रेखाताई कांबळे यांच्या नात श्रेया कांबळे हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही व पेन्सिलचे वाटप ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.

वाढदिवसाचा उत्सव सामाजिक बांधिलकीशी जोडत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशील नगर शाखेचे अध्यक्ष अशोक रोटे होते. यावेळी मुंबई प्रदेशचे सचिव (संस्कार) दिलीप लिहिणार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सरचिटणीस रतन बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या विषयाचे दान संघटिका निलाताई डेरे यांनी केले तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली.यावेळी ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी पुढे आवाहन करताना सांगितले की, “बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार केवळ धार्मिक उपक्रमापुरता मर्यादित न ठेवता शिक्षण, विज्ञान, समता आणि सामाजिक प्रगतीशी जोडला पाहिजे.

आपल्या विभागाचा, गावाचा आणि समाजाचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.”या प्रबोधन कार्यक्रमाला पंचशील नगर शाखेतील महिला, तरुण तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धाच्या विज्ञानवादी विचारांची आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाची दिशा या कार्यक्रमातून उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments