Thursday, February 26, 2026
Homeदौंड*दौंड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात व...

*दौंड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी.*

मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड – लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दौंड शहर व तालुका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती संस्था पूर्ण कृती पुतळा समिती दौंड मातंग समाज एकीकरण समिती व दौंड नगरपरिषद दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जयंतीनिमित्त मंगळवार दि. 1 रोजी दौंड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार रमेश थोरात ,दौंड तहसीलदार अतुल शेलार ,मुख्याधिकारी संतोष टेंगले, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, अनिल सोनवणे, डी वाय जगताप, नागसेन भेंडे ,निलेश नेटके ,राहुल वळू यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुधीर वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फोटो, संविधान व फकीरा कादंबरी ही मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मयुरी कोलथे हिने रांगोळीतून छायाचित्र काढले होते याबद्दल मयुरीचा सन्मान करण्यात आला सन्मान चिन्ह, फकीरा कादंबरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला रिपाई आठवले गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, नागेश साळवे, गुरुमुख नारंग, वसीम शेख ,भारत सरोदे ,सचिन कुलथे, विनायक माने, रवी जाधव साहेबराव पोळ, संजय आडागळे, श्रीकांत पवार ,विलास आडागळे इत्यादी उपस्थित होते.
प्रास्ताविक आबा वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले आभार प्रदर्शन विनायक मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सायंकाळी सात वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यातील चित्राचे भव्य असे मिरवणूक साठे नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आली होती मिरवणुकीत संपूर्ण साठे नगर व दौंड शहरातील व परिसरातील हजारो महिला पुरुष तरुण-तरुणींनी भाग घेतला होता त्यापूर्वी रविवार दिनांक 30 रोजी डॉक्टर उज्वला हातागळे यांचे व्याख्यान कार्यक्रम झाला होता यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे लिंगाळी चे मा जी सरपंच नरेश डाळिंबे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनावर भाषण केले दोन्ही कार्यक्रम अण्णाभाऊ साठे नगर दौंड येथे पार पडले यावेळेस मान्यवरांचा हार पुष्प साल देऊन सत्कार करण्यात आला होता संपूर्ण जयंतीचे कार्यक्रम साठी आबा वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले
अध्यक्ष सागर सोनवणे उपाध्यक्ष उपेश तुपसौंदर्य यांनी सर्वांचे आभार मानले .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments