मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
बारामती येथील काळे प्रेस्टिजच्या मालकानी ६० गाळे धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याची चौकशी होऊन कारवाई होण्या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशांत सोनवणे पुणे जिल्हा महासचिव गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष गणेश भोसले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी दि ११/७/२०२३ रोजी मुंबई मंत्रालय येथे निवेदन दिले आहे या निवेदनात असे नमूद केले आहे की जर आठ दिवसांत काळे प्रेस्टिज चे मालकांची चौकशी होऊन कारवाई झाली नाही तर काळे प्रेस्टिज चे गाळे धारक गणेश चव्हाण हे बारामती प्रशासकीय भवना समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत , परतु बारामती शहर पोलीसान कडुन काळे प्रेस्टीज चे मालकावर कारवाई न केल्याने दि २४ रोजी बारामती येथील प्रशासकिय भवना समोर आमरण उपोषणला बसले होते दि २७ रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी बारामती शहर पोलीस ठाण्याचे तातकालीन उप पोलीस निरिक्षक कुलदीप संकपाळ साहेब यानी सागितले की काळे प्रेस्टीज चे मालक याच्या वर गुन्हा दाखल करण्यात येईल आमरण उपोषण मागे घ्या त्या वेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे म्हणाले की बारामती चे लोकप्रतिनीधी या प्रकरणाची गभींर पणे दखल घ्यावी व तुषार गायकवाड माजी पुणे जि अध्यक्ष यानी मॅगो ज्युस देऊन चव्हाण याचे आमरण उपोषण सोडण्यात आले , उपोषण कर्ते गणेश चव्हाण बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता उपोषणा मुळे त्याना अशक्तपणा आल्याने दि २७ पासुन ते दि १ /८/२०२३ पर्यत खाजगी हॉस्पिटल मध्ये उपघार घेत होते काल दि ३/८/२०२३ रोजी काळे प्रेस्टीज चे मालक याच्या (६० )गाळेधारकाची फसवणुक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे १८६०/४२० //४०६//४६७/५०६/३४/४

