Saturday, July 25, 2026
Homeदौंडभीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्म रथ पदयात्रा यांचे दौंड भारतीय बौद्ध महासभा...

भीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्म रथ पदयात्रा यांचे दौंड भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने दौंड-कुरकुंभ मध्ये उत्साहात स्वागत.

दौंड तालुका मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड -भव्य सामाजिक धम्म क्रांती भीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्मयात्रा पदयात्रे’ चे दौंड-कुरकुंभ या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर वतीने उत्साहात स्वागत करण्यात आली पूज्यनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघाचे प्रमुख नेतृत्वाखाली धम्म पदयात्रा मार्गक्रमण करीत असून दौंड -कुरकुंभ दौंड शहर येथील भारतीय बौद्ध महासभा दौंड व बुद्ध बांधवांच्या वतीने धम्म पदयात्रा भिक्खू संघाचे कुरकुंभ-दौंड स्वागत करण्यात आले. तसेच भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे विकास कदम नवनाथ गायकवाड नरेश डाळिंबे सोमा मासाळ (पुणे वरुन) आशिष गांगुर्डे निलेश आल्हाट नगरसेवक (पुणे ) लांजेवार ताई जाधव ताई. जगदिश शिंदे किरण जाधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते धम्म दान करण्यात आले तसेच १२ जुलै २३ जुलै रोजी ऐतिहासिक क्रांती विजयी स्तंभ भिमा कोरेगाव येथून प्रारंभ झाला धम्म रथयात्रा पदयात्रा ला सुरुवात झाली असून पूज्यनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व अखिल भारतीय भिक्खू संघ, ताडोबा अभयारण्य सहारामगिरी’ चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली धम्म रथ पदयात्रे’ चे आयोजन करण्यात आलेली १२ जुलै ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथून मार्गस्थ झाली पहिल्या दिवशी केसनंद दुसऱ्या दिवशी उरळी कांचन तिसऱ्या दिवशी यवत मुक्काम केला नंतर चौथ्या दिवशी दिनांक १५ जुलै रोजी धम्म पदयात्रा भांडगाव/ चौफुला /वरवंड मार्गे पाटस पांढरेवाडी / कुरकुंभ येथे १६ जुलै दाखल होताच धम्म रथ पदयात्रा भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघाचे आणि. पदयात्रेतील सहकाऱ्यांचे उत्सव स्वागत करण्यात आले संध्याकाळी रावणगाव /भीमनगर मुक्काम ठिकाणी धम्म कार्यक्रम ठिकाणी उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकांना धम्म देसेना देण्यात आली धम्म क्रांती आणि भगवान बुद्धांच्या विचारांचे महत्व सांगितले मुक्काम ठिकाणी भोजन दान करण्यात आले. मुक्काम पार पडला १७ जुलै सकाळी रावणगाव / भीमनगर येथून पुढील प्रवास सुरू केला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments