हिंगोली:वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हा कार्यकर्ता मेळावा आणि नूतन तालुका कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यात पक्षाची आगामी वाटचाल आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी खरात हे होते. तर, प्रमुख मार्गदर्शक हिंगोली जिल्ह्याचे निरीक्षक मा. ज्ञानेश्वर सुलताने साहेब आणि जिल्हा निरीक्षक प्रा. सुरेश सिरसाट सर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि नूतन पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत कशी पोहोचवावीत, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे जुनेच कार्यकर्ते रुपेश भाऊ कदम. सिद्धांत गायकवाड. राहुल भाऊ करवंदे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांनी पक्षांमध्ये पुन्हा घर वापसी केली आहे.
या सत्कार सोहळ्यास आणि मेळाव्यास पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा सहभाग होता:ज्योतिपाल रणवीर (हिंगोली जिल्हा महासचिव)सुनिल खिल्लारे ( वसमत व औंढा जिल्हा मुख्य समन्वयक)अशोक कांबळे (समन्वयक ) वसमत औढा.सज्जन निर्गुडे समन्वयक वसमत औढा. कैलास भुजंगळे सर जिल्हा प्रवक्ते हिंगोली प्रकाश राऊत जिल्हा उपाध्यक्ष . रामेश्वर भालेराव जिल्हा संघटक, विनोद थोरात जिल्हा सचिव, मारुती पंडित जिल्हा सचिव, शेगणी जिल्हा सचिव, रमेश भाई भुजबळ समन्वयक मुकुंद करवंदे समन्वयक माधव सपाटे जिल्हा उपाध्यक्ष, वसमत औंढा, विनोद नाईक हिंगोली तालुकाध्यक्ष, कपिल वाकडे सेनगाव तालुका अध्यक्ष, रंगनाथ स्वामी वसमत तालुका अध्यक्ष, रवी कुमार पंडित कळमनुरी तालुकाध्यक्ष अभय राज भगत तालुका महासचिव औंढा सुरेश कांबळे तालुका महासचिव हिंगोली. शीरत्न खंदारे तालुका महासचिव वसमत, सुनील मुंदडा तालुका महासचिव सेनगाव, प्रकाश भुक्तर तालुका महासचिव सेनगाव प्रियानंद घोडके तालुका महासचिव कळमूरी तसेच, या कार्यक्रमाला सर्व नूतन तालुका पदाधिकारी आणि आजी-माजी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी होते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नूतन तालुका कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्यांसाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांनी एकजुटीने काम करून पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले

