Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरमटका जुगार अड्डे बंद करण्याची रिपब्लिकन युवा सेनेची मागणी.

मटका जुगार अड्डे बंद करण्याची रिपब्लिकन युवा सेनेची मागणी.

मुकनायक प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी कागल गोकुळ शिरगाव गांधीनगर राजारामपुरी करवीर शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका जुगार चालु आहेत या बाबत संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते मात्र हे अड्डे बंद झालेले नाहीत आपण जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक आहात त्या मुळे हे अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांना सक्त ताकीद द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना बुधवारी दुपारी दिले या वेळी कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन युवा सेना यांच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील मटका व जुगार बंद करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील राधानगरी,कागल,गोकुळ शिरगांव,गांधीनगर, पोलीस ठाण्यांना भेटी देऊन निवेदन देण्यात आले.यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात दावणे, संपर्क प्रमुख उदय गेंजगे,सुजित झेंडे,अभिजित कांबळे,व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments