Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजितदादांचा एक फोन आणि सात जण बचावले.

उपमुख्यमंत्री अजितदादांचा एक फोन आणि सात जण बचावले.

मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे

दि ८ मध्यरात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची तत्परता आणि वाचले सात जणांचे प्राण , सगळे झोपेत होते फोन आला यंत्रांना हलली नेमकं घडलं काय ? आज शनिवार पहाटे दोन ची वेळ ,, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुंबईमधील देवगिरी बंगल्यातील फोन ऑपरेटरला ऑपरेटरला पोलादपूर घाटातील भयंकर अपघाताची माहिती कळविण्यात आली , अजितदादा यांना माहिती मिळताच झोपेतून ताडकन उठत आणि अपघातग्रस्तांना मदती साठी शासकीय यंत्रणा हलवतात मध्यरात्री ची वेळ असतानाही पोलादपूर घटनास्थळी आदेशानुसार पोलिस आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी पोहचतात परंतु ती तातडीची मदत मिळेपर्यंत बारामती तालुक्यातील माळेगांव बुद्रुक येथील दत्तात्रेय शरद टेके हा युवक मरण पावला होता, तर सुदैवाने बारामती चे सात युवक या अपघातातुन बचावल्याची माहिती पुढे आली,या अपघाताच्या प्रसंगात पवार यांनी दाखवलेली तत्परता बारामतीकराच्या दृष्टीने महत्वाची ठरल्याचे सांगण्यात आले , बारामती येथील कोष्टी गल्ली मधील आठ युवक दोन चार चाकी गाड्या मध्ये गोव्याला जात होते , शनिवारी दि ८ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलादपूर घाटामध्ये जि रायगड , पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने बारामती च्या या दोन्ही गाड्यांना जोरदार ठोकर देत चिरडले या भीषण अपघातामध्ये किरकोळ दुखापती वगळता बारामती चे सातजण बचावले परतु त्या अपघातग्रस्त गाड्यांमधून माळेगावच्या दत्तात्रेय टेके (वय ४३ ) यांना बाहेर पडता आले नाही , दुर्दैवाने त्या अपघातामध्ये त्याची प्राण ज्योत मावळली ही घटना येवढी भयंकर होती की वाचलेल्या युवकांना रात्रीच्या वेळी काय करावे ते सुचत नव्हते, जखमी पैकी एकाने माळेगांव येथील कार्यकर्ते रविराज तावरे यांना मोबाईल वरून अपघाताची माहिती देत मुदतीची मागणी केली, पोलादपूर च्या घाटात रात्रीच्या वेळी मदत पोहचविणे आव्हानात्मक होते परंतु तावरे यांनी ही रात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अपघाताची माहिती कळविली त्यानुसार पवार यांनीही झोपेतून उठत तातडीने बारामतीच्या अपघातग्रस्तांना मदत पोहचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला , पोलिस आरोग्य विभाग व महसूल विभागाची मदत वेळीच मिळण्यासाठी पवार यांनी रायगड जिल्ह्याचे कलेक्टर, पोलीस अधीक्षक, आणि आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या , आदेशानुसार संबंधीत यंत्रांनाही घटना स्थळी पोहचली परंतु ती तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगावचा युवक मरण पावला, दत्तात्रेय टेके यांच्या मागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे अजितदादांनी केलेली मदत आणि दिलेला आधार आमच्या साठी मोठा आहे दादा म्हणजे आमच्या साठी हा असश्रेयस्थान आहेत अशा शब्दांत टेके परिवारानी अजितदादा यांचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments